कृषी महाराष्ट्र

१० जिल्ह्यांतील ६.३३ लाख शेतकऱ्यांला अतिवृष्टीचे ६७५ कोटी मंजूर ! वाचा संपूर्ण

१० जिल्ह्यांतील ६.३३ लाख शेतकऱ्यांला अतिवृष्टीचे ६७५ कोटी मंजूर ! वाचा संपूर्ण

१० जिल्ह्यांतील ६.३३

सोलापूर : पुणे आणि नाशिक विभागातील दहा जिल्ह्यातील सहा लाख ३२ हजार ८९३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या भरपाईपोटी बुधवारी (ता. ११) ६७५ कोटी ४५ लाख १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. आता भरपाईच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मदतीची रक्कम वर्ग केली जाणार आहे.

राज्य सरकारने अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यानुसार जिरायतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायतीसाठी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये (तीन हेक्टरपर्यंत मर्यादा) देण्याचा निर्णय झाला.

दरम्यान, आतापर्यंत जून ते ऑक्टोबर या काळातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार ६६१ कोटी ३९ लाखांची मदत दिली आहे.

दरम्यान, सप्टेंबर-ऑक्टोबरमधील सततचा पाऊस व ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी, असा प्रस्ताव पुणे व नाशिक विभागीय आयुक्तालयाकडून सरकारला पाठविण्यात आला होता. त्यावर राज्य सरकारने बुधवारी मदत देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार दहा जिल्ह्यातील सव्वासहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आता मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बाधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ही रक्कम थेट वर्ग केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, सांगोला यासह इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

जिल्हा शेतकरी मदतीची रक्कम

  1. पुणे ५२,९०० ४२,८३,९९,०००
  2. सातारा २४,७५४ १७,०४,३४,०००
  3. सांगली ४५,८६८ ४२,२५,१६,०००
  4. सोलापूर ६५,१६६ ११०,५६,५८,०००
  5. कोल्हापूर ५,८६२ ३,७६,९४,०००
  6. नाशिक ९८,२१० ८९,२०,५०,०००
  7. धुळे ५७,९६४ ५१,०४,१८,०००
  8. जळगाव २७,३७० २७,७६,४०,०००
  9. नगर २,५४,६९१ २९०,९१,३३,०००
  10. नंदुरबार १०७ ६,६८,०००

एकूण ६,३२,८९३ ६७५,४५,१०,०००

लाभार्थींची यादी प्रसिद्ध करण्याचे बंधन

राज्य सरकारच्या ऐतिहासिक निर्णयानुसार अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाढीव मदत दिली. आता ज्या शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळाली आहे, त्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. पुणे व नाशिक विभागातील दहा जिल्ह्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला.

स्रोत : esakal.com

675 crores sanctioned for heavy rains to 6.33 lakh farmers of this district १० जिल्ह्यांतील ६.३३

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top