कृषी महाराष्ट्र

डाळिंब लागवड तंत्रज्ञान

डाळिंब लागवड तंत्रज्ञान – Pomegranate Cultivation Technology

 

नमस्कार शेतकरी बंधुंनो आपण आज डाळिंब फळबाग पिकाबद्दल माहिती करून घेणार आहोत. डाळिंब हे फळ असून समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आयुर्वेदातील ग्रंथांमध्ये डाळिंबाचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहेत. इराण या देशाला डाळिंबाचे मुळस्थान मानतात. प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये डाळिंबाचा उल्लेख आढळतो. यावरून इराण मधून आर्यांनी हे फळ भारतात आणले असावे असे मानतात.

भारतात डाळिंबाची लागवड सुमारे १ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर केली जाते, यापैकी ९६ हजार क्षेत्र हे एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादन महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. (Pomegranate information in marathi)

हवामान :

उष्ण,दीर्घ उन्हाळा, कोरडी हवा व साधारण कडक हिवाळा या पिकास चांगलं मनवतो. फळ धारणेपासून फळे तयार होईपर्यंत कडक ऊन व कोरडी हवा आणि पक्वतेच्या काळात साधारणपणे उष्ण व दमट हवा असल्यास चांगल्या दर्जाचे फळे मिळतात. फळांच्या पूर्ण वाढीनंतर आर्द्रता वाढल्यास फळास वरून व आतून चांगलं रंग येतो. परंतु फळांची वाढ होताना आर्द्रतेचे प्रमाण वाढते व फळांचा दर्जा कमी होतो.

जमीन:

डाळिंब पिकास उत्तम नीच्याची हलक्या व मध्यम प्रकारची जमीन योग्य आहे. जमिनीचा सामू ६.५० ते ७.५० इतका असावा. जमिनीत चुनखडीचे प्रमाण अत्यलप असल्यास झाडांची वाढ चांगली होते, परंतु चुनखडीचे प्रमाण ५ ते ६ टक्क्यांवर गेल्यास झाडांची वाढ खुंटते. फार भारी जमिनीत वाढ जोमाने होते, परंतु पुढे झाडाला विश्रांती देणे कठीण होते आणि बहराची अनिश्चितता वाढते.

लागवड कालावधी:

डाळिंबाची लागवड बियंपासून केल्यास झाडे एकसारख्या गुणधर्माची व चांगल्या प्रतीची फळे देत नाही त्यामुळे डाळिंबाची लागवड कलामांपासून करावी.

हे कलमे कडक उन्हाळ्यात सोडता इतर कोणत्याही हंगामात करता येते. परंतु पावसाळ्याच्या सुरुवातीस म्हणजेच जून- जुलै मधे लागवड केल्यास रोपाची मर कमी प्रमाणात होते. म्हणजेच डाळिंब लागवडीसाठी जून जुलै हा कालावधी मधे डाळिंबाची लागवड केली पाहिजे.

जाती:

भारतातील वेगवेगळ्या विभागात विविध प्रकारच्या डाळिंबाच्या जातींची लागवड केली जाते. यामधे फळाचा रंग, आकारमान, चव, गुणवत्ता, दाण्याचा रंग, बियांचा मऊपणा या बाबतीत विविधता आढळून येते. डाळिंबाच्या जाती परत्वे प्रचलित जातीचे गुणधर्म खाली दिलेले आहेत.

१. गणेश (जी. बी. जी.):
ही जात प्रादेशिक संशोधन केंद्र (गणेशखिंड, बोटानिकल गार्डन), पुणे येथे डॉ. चिमा यांनी आळंदी या जातीमधून निवड पद्धतीने विकसित केली आहे या जातीच्या फळांचा आकार, मध्यम ते मोठा असून सालीचा रंग तांबूस पिवळा ते गडद गुलाबी असतो.

या जातीचे खास वैशिष्ट्य म्हणजे दाण्याचा रंग फिकट ते गडद गुलाबी, बिया मऊ व रस गोड असतो. पोषक हवामानात या जातीच्या फळावर लाल गुलाबी रंगाची आकर्षक चकाकी येते. त्यामुळे बाजारात या जातीला जास्त मागणी असते.

२. मस्कत:
अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथे पूर्वीपासून या जाती ची लागवड केली जाते. फळे मध्यम ते मोठा आकाराची असून फळांची साल फिकट हिरवट, गुलाबी, पिवळी व लाल रंगाची असते. दाने फिकट गुलाबी ते लाल रंगाचे असतात या जातीमध्ये अत्यंत मऊ बियांपासून ते कडक बियांपर्यंत दाने असतात ही जात चवीला चांगली असून उत्पादनही भरपूर मिळते.

३. जी-१३७
ही जात महात्मा गांधी फुले विद्यापीठात विकसित केली आहे या जातीचे फळ मोठ्या आकाराचे असून साल गर्द लाल रंगाची असते. दाने आकाराने मोठे असून फळांच्या रंगप्रमाने गर्द लाल रंगाचे असतात. रसात साखरेचे प्रमाण १५% असते. ही जात महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे.

४. बासिन सिडलेस:
बासीन सीडलेस या जातीचे फळातील दाने गुलाबी रंगाची असून मऊ असतात.

५. ज्योती (जी. के. व्ही.के.-१):
ही जात बंगलोर च्य कृषी विद्यापीठ मधील १९७७ सालि विकसित केली गेली. या जातीच्या फळांचा आकार मोठा (२२० ग्रॅम वजन) असून फळातील दाने मोठे, लाल बूँद व फार मऊ बियांचे असतात. दाण्यामधे १६% एकूण द्राव्य घन पदर्थ असतात. फळांचा रंग आकर्षक पिवळसर लाल असतो. याशिवाय फळांच्या खांद्यावर लाली असून फळांची साल पात्तळ असते. फळातील गराचे प्रमाण ७०.५% असते. या जातीला बाजारभाव चांगला मिळतो.

६. मृदुला:
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी गणेश व रशियन जातीच्या संकरापासून मृदुला ही जात शोधून काढली आहे.
या जातीची फळे आकर्षक लाल रंगाची असतात. दाण्याचा रंग आकर्षक लाल असतो. या जातीचे दाने मऊ असल्यामुळे या जातीचे नाव मृदुला असे ठेवले आहे. निर्यातीसाठी ही जात चांगली आहे.

७.भगवा:
ही जात शेंदरी, अष्टगंध, रेड डायना, जय महाराष्ट्र, मस्तानी इ. नावांनी ओळखली जाते. या जातीची फळे १८०-१९० दिवसात तयार होतात सरासरी उत्पादन प्रति झाड ३० किलो आहे.

या जातीची फळे आकाराने मोठी, टपोरी व आकर्षक गोड दाने, आकर्षक केसरी रंगाची, जाड साल त्यामुळे ही जात दूरच्या बाजारपेठेसाठी उपयुक्त आहे. इतर दाण्याचा तुलनेत ही जात काळे ठिपके रोगास आणि फुल किडीस कमी प्रमाणात बळी पडते.

८. फुले आरक्ता:
या जातीची फळांचा आकार मोठा असून दाने मृदू, गोड, टपोरे, गर्द लाल रंगाचे असतात. फळांची साल ही गर्द लाल रंगाची असते काळे ठिपके रोगास आणि फुल किडीस हा वाण कमी प्रमाणात बळी पडतो.

मशागत:

डाळिंब लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरणी करून व कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. हलक्या व मध्यम जमिनीत जमिनीच्या मृदुंगाप्रमाने ४.५×३.० मी अंतरावर ६० सेमी लांबी रुंदी व खोलीचे खड्डे उन्हाळ्यात खणावे.

पावसाळ्यापूर्वी तळाशी पालापाचोळा याचा थर व १ किग्र. सिंगल सुपर फॉस्फेट आणि २ टोपल्या कुजलेले शेणखत टाकून मातीने भरून घ्यावेत.

वाळवीच्या नियंत्रणासाठी प्रत्येक खड्ड्यात १०० ग्रॅम.१० मिथील प्याराथीओन ची भुकटी खत आणि मातीच्या मिश्रणात मिसळावी मध्यम जमिनीत जेथे पाण्याचा निचरा कमी होतो अशा ठिकाणी खड्डा भरून झाल्यावर १ मी रुंद व १ फूट उंच वरंबे तयार करून त्यावर लागवड करावी, जेणेकरून झाडांची वाढ जोमदार होईल.

लागवड पद्धत:

डाळिंबाची बियांपासून अभिवृद्धी केल्यास झाडे एकसारख्या गुणधर्माची फळे देत नाही. त्यामुळे डाळिंबाची लागवड कलामापासून करावी. कारण कलमाच्य झाडांना लवकर फळे लागतात. डाळिंबाची कलमे छाट कलम व सुटी कलम या पद्धतीने तयार करतात.

डाळिंबाच्या झाडामध्ये सर्व साधारणपणे ५ मी×५ मी अंतर ठेवावे . कोणत्याही प्रकारच्या जमिनीत ४ मी×४ मी पेक्षा कमी अंतर ठेऊ नये. त्यानंतर ६०×६०×६० घन सेमी . प्रत्येक खड्ड्यात जमिनीच्या वरच्या थराची माती अधिक५०% शेण खत किंवा व्हर्मीकंपोस्ट अधिक १ किलो सुपर फॉस्फेट चे मिश्रण भरावे. अशाप्रकारे तयार केलेल्या खड्ड्यात जून ते ऑगस्ट महिन्यात कलमांची लागवड करावी व त्यानंतर लगेच कलमांना काठीचा आधार द्यावा.

खत व्यवस्थापन:

पूर्वी डाळिंबाच्या झाडांना रासायनिक व सेंद्रिय खते दिली जायची मात्र गेल्या वर्षापासून सेंद्रिय खतांचा वापर वाढवला आहे. प्रत्येक झाडाला दोन पाट्या शेणखत, तसेच शेणखता त कोंबडी खत व बाजारातील सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. मुख्य अन्न द्राव्यांबरोबर कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, बोरॉन, फेरस यांचाही वापर होतो.

छाटणी केल्यानंतर रासायनिक व सेंद्रिय खत दिले जातात. थ्रीप्स, आळी, लाल कोळी, सुरसा तसेच अन्य किडिक रासायनिक पद्धतीने नियंत्रण ठेवले जाते. पान गळा केल्यानंतर छाटणी करून बहार धरण्याच्या वेळेस पहिले पाणी १०-१२ तास दिले जाते. दुसरे पाणी १५ दिवसांनी दररोज १ तास ठिबक द्वारा देण्याचे नियोजन करावे लागते. फळ सेटिंग झाल्यानंतर पाणी वाढवून रोज दोन तास पाणी दिले जाते.

काढणी:

डाळिंबाच्या झाडावर फळधारणा सुरू झाल्यावर फळे काढणीसाठी १२५-१३० दिवसांनी तोडणीस तयार होतात. परदेशी निर्यातीसाठी एका फांदीवर एकच फळ ठेवणे व संपूर्ण झाडावर ४०-५० फळे ठेवणे आदर्श असते. झाडावर जास्त फळे ठेवल्यामुळे फळांचा आकार लहान होतो. डाळिंबाच्या मोठ्या फळांना बाजारभाव चांगला मिळतो. म्हणून झाडावर फक्त मोठी फळे वाढू द्यावी.

उत्पादन:

डाळिंबाच्या झाडांची चौथ्या वर्षापासून फळे द्यावीत. त्यामुळे प्रत्येक झाडापासून २०-२५ फळे मिळतात. झाडाच्या वयानुसार फळाचे उत्पादन दिवसेंदिवस वाढतच जाते.१० वर्षे वयाच्या झाडापासून दर वर्षी १००-१५० फळे मिळतात. चांगले व्यवस्थापन केलेल्या बागेतील प्रत्येक झाडापासून २००-२५० फळे मिळतात. डाळिंबाच्या झाडाचे आर्थिक उत्पादन २५-३० वर्षापर्यंत मिळते.

पाणी व्यस्थापन:

१) जमिनीमध्ये वाफसा आल्यावरच पाण्याचे निये जन करावे.
२) पाणी व्यवस्थापन त्या ठिकाणच्या बाष्पीभवनाचा दर लक्षात घेऊन करावे.
३) जमिनीच्या मगदुाप्रमाणे नियमित पाणीपुरवठा करणे.
४) ठिबक सिंचन करताना प्रत्येक झाडास १-५ वयापर्यंत ८ ली चे २ ठिबक बसवावेत. ठिबक हा झाडाच्या पायथ्याच्या ६ इंच बाहेर बसवणे आवश्यक आहे ५ वर्ष वयाच्या पुढे २ ऐवजी ४ किंवा ५ ठिबक बसविणे फायदेशीर ठरते.
५) ड्रीपर मधून योग्य त्या प्रमाणात पाणी पडत आहे किंवा नाही याची खात्री करावी.
६) ठिबक सिंचनाची सुविधा नसल्यास पूर्ण वाढ झालेल्या डाळिंबस उन्हाळ्यात ८-१० पावसाळ्यात १३-१४ व हिवाळ्यात १७-१८ दिवसांनी पाणी द्यावे.
७) पाण्यात बचत करण्याच्या दृष्टीने सेंद्रिय अश्छडणाचा वापर करावा
८) झाडांना शिफारस केलेल्या मत्रेनुस म्हणजे प्रति झाड सरासरी २०-२२ लिटर पाणी द्यावे.

कीड व रोग व्यवस्थापन:-

कीड:
डाळिंबाच्या झाडावर वर्षातून तीन वेळा बहार येतो. या काळात दमट व ढगाळ हवामान असल्यास नवीन फुटिवर, फुलांवर आणि फळांवर किडी व रोगांचा जास्त उपद्रव आढळतो. त्यामुळे डाळिंबाची बरेच नुकसान होते. डाळिंब लागवड डाळिंब लागवड

१) मावा, फुलकिडे व पांढरी माशी:
या किडी कोवळी पाने व कोवळ्या फांद्यातील रस शोषण करतात. त्यामुळं झाडाच्या कोवळ्या फांद्या सुकलेल्या दिसतात.

उपाय:
या किडींच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात ५ लिटर इमिडवलोप्रिड किंवा २० मिली dymathoate मिसळून त्या द्रवणाची झाडांवर फवारणी करावी.

२) खवले कीडे:
ही कीडे लहान असून कळ्या रंगाची असते. ही कीडे पाने, कोवळ्या फांद्या व फळतून शोषते. त्यामुळे पाने पिवळी पडून फांद्या वाळतात.

उपाय:
या किडींच्या नियंत्रणासाठी १० ली पाण्यात २५ मिली क्विनालफोस किंवा २० मिली dymathoate मिसळून खोडांवर व फांद्या वर फवारणी करावी.

३) सुरसा :(फळे पोखरणारी आळी)
फळांचे नुकसान करणारी ही महत्वाची कीड आहे. आळी फळ पोखरून फळातील बिया खाते. पोखरलेल्या फळावर आळी ने पडलेल्या छिद्रातून आळीची विष्ठा बाहेर येते. तेथे दुर्गंधी येते अशी फळे सडतात आणि झाडावरून पडतात. ही कीडे बागेत वर्षभर आढळते..

उपाय:
झाडाखाली गळलेल्या फुले, फळे गोळा करून खोल खड्ड्यात पुरून टाकावी. फुले व फळे येण्याच्या हंगामात १० ली पाण्यात २९ मिली dymathoate मिसळून फवारणी करावी. डाळिंब लागवड

डाळिंबाच्या झाडावर इतर किड्यांच बंदोबस्त करण्यासाठी १० ली पाण्यात १० मिली मलेथियन किंवा ४० ग्राम कर्बरील अधिक २० ग्राम झायनेब किंवा मंकोझेब मिसळून त्या द्रावणाची फवारणी फुळधरणेच्या वेळेपासून फळांची तोडणी होईपर्यंत ३ आठवड्यांची अंतराने करावी.

रोग:
१) फळांवरील काळे डाग:
जास्त पावसाळी हवामानामध्ये जिवाणू मुळे डाळिंबाच्या फळांवर काळे डाग पडतात.

उपाय:
या रोगाच्या नियंत्रणासाठी १०० पिपियेम streptomycin किंवा १०० पिपियम agromysin ची फळांवर फवारणी करावी.

२) पानांवरील ठिपके:-
डाळिंबाच्या पानांवर फिकट तपकिरी ते जांभळसर , चक्राकार आणि वेडेवाकडे ठिपके दिसून येतात. हे ठिपके एकमेकांत मिसळून नंतर काळपट ठीपक्यात त्यांचे रूपांतर होते. रोगट पाने पिवळी पडून गळतात. फळ झाडांवर सुद्धा रोगाची लक्षणे दिसतात. रोग लागल्यावर फळे आतून कुजतात.

उपाय:
या रोगाच्या नियंत्रणासाठी नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात १० ली पाण्यात१० ग्राम बाविस्तीन किंवा २५ ग्राम सुफेक्स पावडर मिसळून तयार केलेल्या द्रवणची पानांवर व फळांवर फवारणी करावी.

जगभरातील अन्य बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा – birdocean.com

 

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top