कृषी महाराष्ट्र

पीक विम्याची ७५ टक्के रक्कम वाटपास सुरू – Crop Insurance

पीक विम्याची ७५ टक्के रक्कम वाटपास सुरू – Crop Insurance

 

खरीप पीक विमा 2021 संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. 2021 मध्ये बऱ्याच जिल्ह्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढून शेतकऱ्यांना (Agriculture) पात्र करण्यात आले होते. याचं अनुषंगाने राज्यात 23 जिल्ह्यांत अधिसूचना प्रकाशित करण्यात आल्या होत्या. या अधिसूचना जारी केल्यानंतर शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ (Financial) रक्कम वितरीत करण्यात आली होती. यानंतर शेतकऱ्यांना (Agriculture Information) उर्वरित पिक विम्याची प्रतीक्षा होती. हाच उर्वरित पीक विमा (Crop Insurance) वाटप करायला सुरुवात झाली आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उर्वरित पीक विमा वाटप सुरू

पीक विमा 2021 ची शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच 25 टक्के आगाऊ रक्कम जमा करण्यात आली होती. ज्यातील 75 टक्के उर्वरित रक्कम (Financial) तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. उदा. शेतकऱ्यांचा किंवा महसूल मंडळाचा 20 हजार रुपये पीक विमा (Crop Insurance Scheme) मंजूर झाला असेल त्यातील 25 टक्के रक्कम म्हणजेच 5 हजार रुपये रक्कम तुमच्या खात्यावर (Account) जमा झाली असेल तर त्यातील उर्वरित 15 हजार रुपये रक्कम आता खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

2022 चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात

अतिवृष्टीमुळे जून ते ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई देखील पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या (Agriculture in Maharashtra) खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक स्थैर्य मिळत आहे. शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी सरकारकडून तब्बल 3 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

संदर्भ :- mieshetkari.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top