Crop Insurance : ३१ जुलैपर्यंत पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदत
Crop Insurance
Akola News : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम व रब्बी हंगामात राबविण्याबाबत येणार आहे. योजनेअंतर्गत सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे.
अंतिम दिनांकापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. अकोला जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०२३ अंमलबजावणी करिता एचडीएफसी इर्गो कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. (Crop Insurance)
खरीप ज्वारी, कापूस, तूर, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांसाठी सर्व तालुके व सर्व महसूल मंडळांसाठी ही योजना लागू आहे. यामुळे पीकविमा योजनेमध्ये हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, (Crop Insurance)
पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान या बाबींचा समावेश आहे.
या योजनेत सन २०२३-२४ पासून शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून पोर्टलवर नोंदणी करता येईल. पीकविमा संरक्षण मिळविण्यासाठी ३१ जुलै २०२३ पूर्वी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
source:agrowon