कृषी महाराष्ट्र

Monsoon Update 2023 : काही जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचा इशारा ? तर ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट ! वाचा सविस्तर

Monsoon Update 2023 : काही जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचा इशारा ? तर ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट ! वाचा सविस्तर

Monsoon Update

Weather Update : राज्यात ठिकठिकाणी माॅन्सून सरी पडत आहेत. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही भागांमध्ये पावसाच्या सरी होत आहेत. आजही मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर बुहतांशी ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला.

माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीपेक्षा दक्षिणेकडे सरकला. कमी दाबाचा पट्टा बिकानेर, कोटा, रायसेन, मांडला, अंबिकानगर, बालासोर ते बंगालच्या उपसागराच्या मध्यापर्यंत आहे. कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमध्ये साडेचार किलोमीटर उंचीवर पूर्व पश्चिम वाऱ्याचे जोड क्षेत्र आहे. किनारपट्टीला समांतर कमी दाबावाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत विस्तारला आहे. Monsoon Update 2023

पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीलगत समुद्रपाटीपासून १.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही चक्राकार वाऱ्याची स्थिती नैऋत्येकडे झुकलेली आहे. आग्नेय अरबी समुद्रात दक्षिण गुजरातलगत आणखी चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे दक्षिणेकडे आलेला माॅन्सूनचा आस आणि किनारपट्टीलगत चक्राकार वारे यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. Monsoon Update 2023

राज्यातील अनेक भागांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी पावसाने हजेरी लावली. तर काही भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची प्रतिक्षा असलेल्या अनेक ठिकाणी पाऊस झाला.

कोकण, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये ठिकठकाणी पावसाच्या सरी पडल्या. तर विदर्भातील बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूरसह पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. खानदेशातही पावसाच्या सरींनी ठिकठिकाणी हजेरी लावली.

हवामान विभागाने आज रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. तर कोकणातील सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक तर विदर्भातील यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि खानदेशातील जळगाव, धुळे, नंदूरबार आणि विदर्भात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

source:agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top