कृषी महाराष्ट्र

Monsoon Session : नुकसानग्रस्तांना मिळणार आर्थिक मदत ! मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Monsoon Session : नुकसानग्रस्तांना मिळणार आर्थिक मदत ! मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

 

Monsoon Session : राज्यात झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरांचे आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. नुकसानग्रस्तांना प्रतिकुटुंब १० हजार रुपये वाढीव मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसंच दुकानदार, टपरी धारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

नुकसानग्रस्तांना ही वाढीव मदत जून ते ऑक्टोबर २०२३ या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्ती म्हणून देण्यात येणार आहे. या पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नुकसानग्रस्तांसाठी १० रुपये देण्याची आर्थिक मदत जाहीर केली आहे. Monsoon Session

‘उमेद’ अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटांना देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. तसेच कर्मचारी आणि चळवळीतील संसाधन व्यक्तींना देखील मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या वाढीमुळे अतिरिक्त ९१३ कोटी रुपये एवढ्या निधीची तरतुद राज्य शासनामार्फ़त करण्यात येणार आहे.

दरम्यान, स्वयं सहाय्यता गटांना दैनंदिन मार्गदर्शन करण्यासाठी गावपातळीवर एकूण ४६ हजार ९५६ समुदाय संसाधन व्यक्ती(CRP) कार्यरत आहेत. त्यांना सर्वसाधारणपणे दरमहा ३ हजार रुपये मानधन देण्यात येते. बचत गट चळवळीतील त्यांचे योगदान व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करून ते प्रतिमहा ६ हजार रुपये एवढे करण्यात येणार आहे. या करिता १६३ कोटी रुपये एवढ्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

source : agrowon

Monsoon Session

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top