कृषी महाराष्ट्र

फळांची निर्यात करतांना घ्यावयाची काळजी : वाचा संपूर्ण माहिती

फळांची निर्यात करतांना घ्यावयाची काळजी : वाचा संपूर्ण माहिती

 

फळबाग लागवडीमध्ये शेतकऱ्यांचा आता मोठ्या प्रमाणात कल आहे. जर आपण फळबागांचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये विविध प्रकारच्या फळबागांची लागवड केली जाते. शेतीमध्ये येत असलेले नवयुवक मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे वळत आहेत. जर आपण बऱ्याच फळ पिकांचा विचार केला तर निर्यातीला खूप मोठ्या संधी आहेत. परंतु फळांची निर्यात करताना बऱ्याच गोष्टींचे पालन करणे खूप गरजेचे असते.

तुम्हाला ज्या देशांमध्ये फळांची निर्यात करायचे आहेत त्या त्या देशांचे विविध मानके आणि निकष असतात, त्यांचे देखील तंतोतंत पालन करणे गरजेचे असते. या माध्यमातून फळांची निर्यात करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे याबद्दल माहिती घेऊ.

तुम्हालाही करायची आहे फळांची निर्यात तर या गोष्टींची घ्या काळजी

1- यामध्ये सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला जी फळे निर्यात करायचे आहेत त्याच्यावर कुठलाही प्रकारच्या रोग व किडीचा प्रादुर्भाव नसावा व ती हिरव्या रंगाची तसेच नाजूक असावी.

2- तसेच काही भागांमध्ये डागाळलेले फळे असतात किंवा काही पिवळी देखील असतात. अशा फळांना निवडून वेगळे करून घेणे गरजेचे असते. म्हणजेच फळांचे प्रतवारी करूनच निर्यातीसाठी फळांची निवड करणे महत्त्वाचे आहे.

3- तुम्हाला ज्या फळांची निर्यात करायची आहे अशा फळांच्या पॅकिंगसाठी तुम्ही जूटच्या धाग्यापासून तयार केलेल्या मोठ्या आकाराच्या पिशव्यांचा वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून हवा खेळती राहते.

4- फळे गुंडाळण्यासाठी टिशू पेपरचा वापर करणे महत्त्वाचे ठरते. यामुळे बाष्पीभवन कमी होते व फळे टिकण्याचा कालावधी वाढतो.

5- थंड वातावरण असताना फळांची तोडणी करणे गरजेचे असते. साधारणपणे तापमान 7 ते 10° आणि आद्रता 90 ते 95 टक्के पर्यंत असावी.

6- टिशू पेपरचा वापर पॅकिंगसाठी करणे गरजेचे असून त्यानंतर कॅरोगेटेड फायबर बोर्ड बॉक्स वापरावे.

7- जी फळे निर्यातीसाठी पाठवायचे आहे अशा फळांवर कीटकनाशकाची किंवा बुरशीनाशकाचे अवशेष हे एम आर लेव्हल पेक्षा जास्त नसावेत.

8- या बुरशीनाशकावर किंवा कीटकनाशकाचा वापरावर बंदी घातली आहे अशा कीटकनाशकांची फवारणी भाजीपाला पिकामध्ये करू नये.

स्रोत : krishijagran.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top