Onion Market : बाजारात कांदा दर पडले ? सरकारच्या अनुदानाच्या घोषणेमुळे आवक वाढली ! वाचा संपूर्ण माहिती
Onion Market
Onion Subsidy : कांद्याचे दर (onion rate) कमी झाल्यानंतर राज्य सरकारने कांद्याला अनुदान जाहीर केले. ३१ मार्चपुर्वी विक्री झालेल्या कांद्याला अनुदान मिळणार आहे. पण सरकारच्या या निर्णयामुळे बाजाराला आधार मिळण्याऐजी दर कोसळले. शेतकरी ३१ मार्चच्या आधी कांदा विकण्याची घाई करत असल्याने बाजारात आवक वाढली. त्यामुळे दरावर दबाव आला.
राज्य सरकारने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या दोन महिन्यांमध्ये बाजारात विक्री झालेल्या लाल कांद्याला प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले होते. २७ मार्चला याबाबतची अधिसूचना काढली. म्हणजेच कांदा विक्रीची मुदत ५ दिवस होती.
लाल कांद्याची कमी असलेली टिकवणक्षमता आणि दबावातील बाजारभाव यामुळं शेतकरी ३१ मार्चपर्यंत कांदा विकण्यासाठी धडपड करत असल्याचं दिसतं. त्यामुळं कांदा आवक वाढून दर पडल्याची चर्चा आहे. Onion
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा अनुदानाची घोषणा केल्यानंतर दरात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची सुधारणा झाली होती. तसचं बाजारातील आवकही काहीशी घटली होती. पण सरकारन २७ तारखेला अधिसूचना काढून ३१ मार्चची मुदत जाहीर केली.
तेव्हापासून बाजारातील लाल कांदा आवक वाढलेली दिसते. काल, बुधवारी सोलापूर बाजार समितीत १ लाख ३५ हजार क्विंटलची आवक झाली होती.
२५ मार्च रोजी सोलापुरातील आवक ७९ हजार क्विंटल होती. साक्री बाजारातील आवक ५२ हजारावर होती, ती ९० हजार क्विंटलवर पोचली. त्यामुळं दरावर आणखी दबाव आला.
सरकारने कांदा अनुदान जाहीर करताना सात बाऱ्यावर नोंदीची अट टाकली. पण अनेक शेतकऱ्यांना सात बाऱ्यावर कांदा नोंद करण्यात अडचणी येत आहेत. तसेच परराज्यात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले. तसेच बांधावरून कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली.
२७ मार्चपूर्वी गुणवत्तेच्या कांद्याचे दर सरासरी ८०० रुपयांपर्यंत होते. पण मागील तीन दिवसांमध्ये बाजारातील आवक वाढल्याने हा भाव ६०० रुपयांवर आला. त्यामुळं शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसानं कांद्याला फटका बसला. हाही कांदा बाजारात येत आहे. याचाही परिणाम दरावर जाणवत आहे. Onion
कांदा अनुदानाची प्रक्रिया सरकारला सुटसुटीत करता आली असती. सरकारने पुढची मुदत दिल्यानं बाजारातील चित्र बिघडलं. आधीच कांदा दर दबावात असल्यानं किमान अनुदान तरी पदरात पडावं यासाठी शेतकरी कांदा विकत आहेत.
- हे पण वाचा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान भेटणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा
वाढलेला उत्पादन खर्च, उत्पादनातील घट, पडलेले बाजारभाव यामुळं आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांची ही अपेक्षा काही चुकीची नाही. पण सरकारनं अनुदान जाहीर करूनही कांदा उत्पादक देशोधडीला लागेल याची सोय केली, अशी टीका शेतकरी करत आहेत.
लाल कांद्याचा आवक हंगाम संपण्यापुर्वीच सरकारने अनुदान जाहीर केले. त्यामुळे एप्रिलमध्ये येणार कांदाही आज बाजारात येत आहे. त्यामुळे बाजारावर दबाव आला. अनुदानाची मुदत मर्यादीत न ठेवली नसती तर कांद्याचं पॅनिक सेलिंग झाले नसते. बाजारात कांद्याचे भाव नुकसानपातळीच्या वर जाण्याची शक्यता होती. यामुळं सरकारचा अनुदानावरील खर्चही वाचला असता.
दीपक चव्हाण, शेतीमाल बाजार अभ्यासकचालू हंगामात लाल कांद्याच्या दरावर दबाव आहे. बाजारात गुणवत्तेप्रमाणं दर मिळत आहे. दूर अंतरावर पाठवता येत नाही अशा कांद्याचे भाव कमी आहेत. गुणवत्तेच्या कांद्याचे दर तुलनेत अधिक आहेत.
मनोज जैन, कांदा व्यापारी आणि निर्यातदार, नाशिक
onion rate today, onion price today, onion rate, onion market rate today, nasik onion price today, nashik onion market rate today, onion price in pune, price of onion in pune, onion rate today pune, today onion rate in pune market, today onion price, onion wholesale price today, onion market rate today solapur, onion price in maharashtra, solapur today onion rate in solapur market, solapur market yard rates today, onion price maharashtra, onion market price, kanda rate today,