कृषी महाराष्ट्र

Loan | २५ वर्षांनंतर शेतकऱ्यांच टेन्शन मिटणार ! शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा

Loan | २५ वर्षांनंतर शेतकऱ्यांच टेन्शन मिटणार ! शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा

 

Loan | अनेकदा आर्थिक मदतीसाठी शेतकरी बँकांकडून कर्ज घेतात. मात्र नैसर्गिक संकटांमुळे किंवा इतर काही कारणांनी उत्पादन न निघाल्याने शेतकऱ्यांकडून कर्जाची (Bank Loan) थकबाकी राहते. दरम्यान खूपदा शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात. यापार्श्वभूमीवर भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मागील वर्षी नोव्हेंबर (November) महिन्यात हा निर्णय घेण्यात आला होता.

सातबारा आता कोरा होणार

या निर्णयाची अंमलबजावणी यावर्षी मार्च महिन्यात झाली. यामुळे छत्रपती संभाजीनगर (Chhtrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील ४ हजार १०५ शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होणार आहे. सुमारे २५ वर्षांनंतर हा सातबारा कोरा होण्यास सुरुवात झाली आहे. याप्रकरणी सहकार विभागाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

यासाठी मिळायचे कर्ज Loan

औरंगाबाद जिल्हा भूविकास बँक ही शेतकऱ्यांना दीर्घ आणि मुदतीचे कर्ज देणारी सहकारी बँक होती. ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक मोटारपंप खरेदीसाठी व पाइपलाइन टाकण्यासाठी या बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज दिले जात होते. तसेच कर्ज देताना शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर कर्जाची नोंद केली जात होती. राज्य सहकारी भूविकास बँकेच्या या कर्जाला राज्यशासनाची गॅरंटी असायची.

बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते.

यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank) भूविकास बँकेला सहज कर्ज उपलब्ध होत होते. मात्र सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. यामुळे कर्जाची वसुली झाली नाही. पर्यायाने भूविकास बँकेला कर्जवाटप करता आले नाही. शिवाय राज्य सरकारनेही बँकेला कर्ज देताना दरवर्षीप्रमाणे गॅरंटी घेण्यास नकार दिल्याने बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते.

शेतकरी अडचणीत

छत्रपती संभाजीनगर मधील ४ हजार १०५ शेतकऱ्यांकडे व्याजासह १२८ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी होती. भूविकास बँकेकडून ही रक्कम वसूल होत नव्हती. राज्यातील इतर प्रत्येक जिल्ह्यातील भूविकास बँकेची देखील अशीच परिस्थिती होती.भूविकास बँकेची कर्जाची थकबाकी असल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नव्हते.

सरकारकडून कर्जमाफी देण्याचा निर्णय

एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा असल्याने त्यांना शेतीची वाटणी करणे अथवा शेतीची विक्री करणे शक्य न्हवते. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मागील वर्षी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्य सरकारने भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला.

कर्जखाते बेबाक करण्याची प्रक्रिया

या निर्णयानुसार जिल्ह्यातील ४१०५ शेतकऱ्यांचे कर्जखाते बेबाक करण्याची प्रक्रिया भूविकास बँकेने पूर्ण केली आहे. यानंतर बँकेने याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सांगितले आहे.

source : mieshetkari

[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”carousel” /]

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top