कृषी महाराष्ट्र

शेतमालाच्या दरात घसरण सुरूच ! वाचा सविस्तर

शेतमालाच्या दरात घसरण सुरूच ! वाचा सविस्तर

शेतमालाच्या दरात घसरण

नांदेड : जिल्ह्यात सध्या शेतीमालाच्या दरात (Agriculture Market Rate) घसरण सुरूच आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात सध्या हरभरा (Chana), तूर, हळद (Turmeric) व सोयाबीनची आवक (Soybean Arrival) सुरू आहे.

यात हळदीला सरासरी दर सहा हजार तीनशे, सोयाबीन ५,२५० रुपये, तूर ६,४०० रुपये, तर हरभऱ्याला ४,०५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्राने दिली.

जिल्ह्यात सध्या शेतीमालाच्या दरात घसरण सुरू असून, अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, हरभरा या शेतीमालाला चांगला दर मिळेल या आशेने पेरणी मोठ्या प्रमाणात केली.

नैसर्गिक संकटाचा सामना करत उत्पादन हाती आल्यानंतर त्याला चांगले दर मिळेल, अशी आशा असताना मागील काही दिवसांपासून शेतीमालाच्या दरात सतत घसरण होत आहे. सोयाबीनला नांदेड बाजार समितीमध्ये कमाल दर ५,३४०, किमान ४,७९५ तर सरासरी पाच हजार दोनशे पन्नास रुपये दर मिळत आहे.

हळदीला कमाल दर ७,१५० किमान ६,०००, तर सरासरी सात हजार तीनशे रुपये दर मिळाला. तुरीला कमाल दर ६,४७० कमाल ६,५५०, तर सरासरी ६,४०० दर मिळाला.

दरम्यान, हरभऱ्याची आवक सुरू झाली असून, या हरभऱ्याला कमाल दर ४,०५० किमान ४,०५०, तर सरासरी चार हजार पन्नास रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजारामध्ये शेतीमालाचे दर सतत घसरत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेऊन आवश्यकतेनुसार शेतीमालाचे विक्री करत आहेत. दरम्यान शेतीमाल घरात पडल्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत.

जिल्ह्यात धने काढणीला प्रारंभ

देगलूर, धर्माबाद, नायगाव व बिलोली या भागांत शेतकऱ्यांनी पीक बदल करून धने पिकाची लागवड केली आहे. सध्या या भागात धन्याची काढणी सध्या सुरू असून, धर्माबाद बाजारामध्ये धन्याची विक्री केली जाते.

Source: agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top