कृषी महाराष्ट्र

Crop Damage : अतिवृष्टिग्रस्तांसाठी १४ कोटी रुपये अनुदान वितरणास मंजुरी ! वाचा सविस्तर

Crop Damage : अतिवृष्टिग्रस्तांसाठी १४ कोटी रुपये अनुदान वितरणास मंजुरी ! वाचा सविस्तर

 

Crop Damage : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ८ तालुक्यांमध्ये यंदा जून व जुलै महिन्यांतील अतिवृष्टी व पुरांमुळे पिकांचे नुकसान झालेल्या २७ हजार ९४३ बाधित शेतकऱ्यांसाठी १४ कोटी ८२ लाख ३ हजार १५० रुपये निधी वितरणास मंगळवारी (ता. ३) महसूल व वन विभागाने काढलेल्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे.

त्यात परभणी जिल्ह्यातील ४ तालुक्यांतील बाधित २०१ शेतकऱ्यांसाठी २७ लाख ७४ हजार ९५० रुपये व हिंगोली जिल्ह्यातील ४ तालुक्यांतील बाधित २७ हजार ७४२ शेतकऱ्यांसाठी १४ कोटी ५४ लाख २८ हजार २०० रुपये निधीचा समावेश आहे. हा निधी थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित केला जाणार आहे. Crop Damage

या वर्षीच्या जून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली मंडळे) परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी या ४ तालुक्यांतील ३१ गावांतील २०१ शेतकऱ्यांच्या ०.२० हेक्टर बागायती व १२३.१८ हेक्टरवरील फळपिके मिळून एकूण १२३.३८ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले होते. Crop Damage

पीक नुकसानीबद्दल बागायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी १७ हजार रुपयांनुसार ३ हजार ४०० रुपये, तर फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी २२ हजार ५०० रुपयांनुसार २७ लाख ७१ हजार ५५० रुपये, असे दोन्ही मिळून एकूण २७ लाख ७४ हजार ९५० रुपये निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव या ४ तालुक्यांतील अनेक मंडलांत अतिवृष्टी झाली. ओढे, नाले, नद्यांच्या पुरांचे पाण्यात पिके बुडाली. जमिनी खरडून गेल्या.

अतिवृष्टी अनुदान मंजूर स्थिती

(क्षेत्र हेक्टरमध्ये, तर निधी रुपयांत)

तालुका बाधित क्षेत्र बाधित शेतकरी मंजूर निधी

जिंतूर ०२० १ ३,४००

सेलू २ ४ ४५,०००

मानवत १०.९६ २,४६०००

पाथरी ११०.२२ १८४ २४,७९९५०

कळमनुरी ५५०१ ७४९८ ५,१०,५१,०००

वसमत १०८९८ १९७५० ९,२६,७७,०००

औंढा नागनाथ ४.६ १९ ४२,५००

सेनगाव १९५ ४७५ १६,५७,५००

source: agrowon

Crop Damage

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top