कृषी महाराष्ट्र

केंद्र सरकार करणार पिकांचा डिजिटल सर्व्हे ! वाचा सविस्तर

केंद्र सरकार करणार पिकांचा डिजिटल सर्व्हे ! वाचा सविस्तर

पिकांचा डिजिटल सर्व्हे

Digital Crop Survey Update : पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारच्यावतीने डिजिटल पीक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही प्रणाली आता सहा राज्यांमध्ये राबवली जाणार आहे. केंद्राने गुरुवारी डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू करण्यासाठी आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांशी करार केला. Crop Survey

डिजिटल क्रॉप सर्व्हे हा सरकारच्या अॅग्रिस्टॅक किंवा इंडिया डिजिटल इकोसिस्टम फॉर अॅग्रिकल्चरचा (IDEA) भाग आहे. त्याची 2020 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. डिजिटल पीक सर्वेक्षणाच्या अंमलबजावणी योजनेबाबत राज्य सरकारांशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याप्रसंगी, डिजिटल पीक सर्वेक्षणासाठी वेब पोर्टल आणि मोबाईल ऍप्लिकेशनच्या पुस्तिकाचे अनावरण करण्यात आले. Crop Survey

या कार्यशाळेत डिजिटल पीक सर्वेक्षणाची अंमलबजावणी योजना, विविध लाभधारकांना होणारे फायदे, केंद्र सरकारच्या जबाबदाऱ्या यावर चर्चा करण्यात आली. कार्यशाळेत राज्यांकडून अपेक्षा आणि डिजिटल पीक सर्वेक्षणाच्या प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्राकडून मिळणारे समर्थन यावरही भर देण्यात आला.

कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रमोद कुमार मेहेरदा म्हणाले, “डिजिटल पीक सर्वेक्षणमध्ये देशातील सर्व शेतजमिनींवर वेगवेगळ्या कृषी हंगामात लागवड केलेल्या जाणाऱ्या पिकांची इंथभूत माहिती दिली जाईल. (E – Peek Survey)

केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात, ज्यामध्ये अनुदान, पीकविमा, नुकसान भरपाई इत्यादीचा समावेश आहे; मात्र, अनेक राज्यामध्ये पिकाची नोंद करण्यासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाकडून अनुदान, विमा किंवा नुकसान भरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब होत असतो.

यासाठी राज्य शासनाकडून दिलेल्या माहितीवर अवलंबून न राहता डिजिटल स्वरूपात केंद्र सरकारला अद्यावत माहिती उपलब्ध व्हावी, या अनुषंगाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा तात्काळ लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

source :agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top