राज्यात पुन्हा पावसाची शक्यता : वाचा आजचे हवामान अंदाज 09 एप्रिल 2023
पुन्हा पावसाची शक्यता
Weather Update : महाराष्ट्रावर तसेच संपूर्ण देशात या आठवड्यात समान १०१० हेप्टापास्कल हवेचा दाब राहणे शक्य आहे. पूर्व किनारपट्टीवर गुरुवारी आणि शुक्रवारी (ता.१३ व १४) हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहणे शक्य आहे.
त्यामुळे बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे शक्य आहे. महाराष्ट्रावरही मंगळवारी (ता. ११) १००८ हेप्टापास्कल इतक्या कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान ढगाळ राहील. जेथे हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल तेथे पावसाची शक्यता निर्माण होईल.
आज (ता. ९) अमरावती, बुलडाणा, अकोला जिल्ह्यांत ५० मिमी, तर नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत २५ ते ३५ मिमी पावसाची शक्यता आहे. वर्धा व नागपूर जिल्ह्यांतही आज (ता. ९) १५ ते २२ मिमी पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यातही ५ ते १० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहण्यामुळे तसेच अरबी समुद्र, बंगालचा उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत, तर हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असल्यामुळे हा पाऊस होत आहे.
प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस असून, सध्या तरी एल निनोचा प्रभाव नाही. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढीमुळे मोठ्या प्रमाणात बाष्पनिर्मिती होऊन उन्हाळ्यातही पाऊस होत आहे. वाऱ्याचा वेग साधारणच राहील. उद्या (ता. १०) महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. (Rain Update)
कोकण
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आज व उद्या (ता. ९ व १०) ५ ते ७ मिमी पावसाची शक्यता असून, वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. ठाणे जिल्ह्यात आज (ता. ८) ८ मिमी पावसाची शक्यता आहे. रायगड व ठाणे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
वाऱ्याचा वेग सर्वच जिल्ह्यांत ताशी ३ ते ५ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ७५ ते ९० टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४३ ते ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३४ ते ३८ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २२ ते ३० टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
आज (ता.९) जळगाव जिल्ह्यात ३८ मिमी, धुळे व नाशिक जिल्ह्यांत २५ मिमी तर नंदूरबार जिल्ह्यात १० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ४ ते ८ किमी राहील.
कमाल तापमान नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ३९ ते ४० अंश सेल्सिअस, तर जळगाव व धुळे जिल्ह्यांत ३७ ते ३८ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ४० ते ४४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २१ टक्के राहील.
मराठवाडा
आज (ता. ९) जालना जिल्ह्यात ३८ मिमी, परभणी जिल्ह्यात १० मिमी, हिंगोली जिल्ह्यात ९ मिमी तर नांदेड, बीड व संभाजीनगर जिल्ह्यांत ४ मिमी पावसाची शक्यता आहे. धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड व जालना जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर उर्वरित जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील.
वाऱ्याचा ताशी वेग बीड जिल्ह्यात ताशी १३ किमी, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ताशी ७ ते १२ किमी राहील. कमाल तापमान नांदेड जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, संभाजीनगर जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, तर धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील.
बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३७ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत आज (ता. ९) ५३ ते ५७ मिमी, तर वाशीम जिल्ह्यात ५ मिमी पावसाची शक्यता आहे. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.
वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किमी राहील. कमाल तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर वाशीम जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३२ टक्के राहील. Rain Update
मध्य विदर्भ
आज (ता.९) यवतमाळ जिल्ह्यात ९ मिमी, वर्धा जिल्ह्यात १५ मिमी आणि नागपूर जिल्ह्यात २२ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.१०) वर्धा जिल्ह्यात व नागपूर जिल्ह्यात ८ मिमी पावसाची शक्यता आहे.
यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर नागपूर जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ताशी ९ किमी, तर यवतमाळ जिल्ह्यात ताशी ४ किमी राहील.
कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्व जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ टक्के राहील.
पूर्व विदर्भ
चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत आज (ता.९) ५ मिमी पावसाची शक्यता आहे. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, भंडारा जिल्ह्यात वायव्येकडून, तर चंद्रपूर जिल्ह्यात ईशान्येकडून राहील.
वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किमी राहील. कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २५ टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज (ता. ९) कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ११ मिमी, तर सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ७ ते ८ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. १०) कोल्हापूर जिल्ह्यात १५ मिमी, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत ७ ते ८ मिमी पावसाची शक्यता आहे.
वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते १३ किमी, तर उर्वरित सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत ८ ते ९ किमी राहील. कोल्हापूर जिल्ह्यात ताशी ४ किमी राहील.
कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, पुणे जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तर सांगली व नगर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस आणि सातारा जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे व नगर जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील.
आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८५ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात ५० ते ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २८ टक्के राहील.
कृषी सल्ला
– पिकाची पाण्याची गरज आणि तापमानाचा अंदाज घेऊन ठिबक सिंचनाचा कालावधी ठरवावा.
– वणवा लागून फळबागांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बागेभोवती ठरावीक अंतरावर वणवारोधक पट्टे काढावेत.
– धान्य साठवणुकीपूर्वी त्यातील ओलावा १० टक्क्यांपेक्षा कमी राहील, याची काळजी घ्यावी.
– दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल. पुन्हा पावसाची शक्यता पुन्हा पावसाची शक्यता पुन्हा पावसाची शक्यतापुन्हा पावसाची शक्यता पुन्हा पावसाची शक्यता पुन्हा पावसाची शक्यता पुन्हा पावसाची शक्यता पुन्हा पावसाची शक्यता पुन्हा पावसाची शक्यता
source : agrowon