कृषी महाराष्ट्र

Cotton Crop Fertilizer : खतामुळे २८ शेतकऱ्यांचे २०० एकरांतील कपाशीचे पीक उद्ध्वस्त

Cotton Crop Fertilizer : खतामुळे २८ शेतकऱ्यांचे २०० एकरांतील कपाशीचे पीक उद्ध्वस्त

 

Cotton Crop Fertilizer : गुजरातमधील एका कंपनीच्या खतामुळे २८ शेतकऱ्यांचे २०० एकरांतील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. परिणामी, भरपाई आणि कृषी केंद्र संचालकार कारवाई न केल्यास आंदोलन करू, असा इशारा कुही तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. cotton crop

कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सोमवारी (ता.२) नागपूर दौऱ्यावर होते. या वेळी शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेत हा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, गुजरातेतील एका कंपनीचे खत त्यांनी कपाशी, धान, मिरची या पिकांकरिता वापरले. मात्र काही दिवसांत या खताचा विपरीत परिणाम पिकावर दिसून आला. या खताच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामध्ये कुही तालुक्‍यातील वरीखंडी, ससेगाव, टाकळी, मांगली येथील २८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. २०० एकरांतील पिकांना याचा फटका बसला असून, त्यापोटी भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. Cotton Crop Fertilizer

विशेष म्हणजे २१ जुले २०२३ रोजी या खतावर विक्री बंदीचा आदेश लादण्यात आला. त्यानंतरही वग गावातील वैद्य कृषी केंद्राच्या संचालकांनी शेतकऱ्यांना या खताची विक्री केली, असा आरोपही शेतकरी करीत आहेत. त्याकरीता ई-पॉस मशिनचा साठा निरंक दाखविण्यात आला. ई-पॉस मशिनमध्येही याकरिता छेडछाड करण्यात आली. हाच कृषी केंद्र संचालक युरियाची जादा दराने विक्री करीत असल्याचा पुरावाही या वेळी कृषिमंत्र्यांना सादर करण्यात आला.

विहित नमुन्यात बिल न देता केंद्र संचालक इस्टिमेट बिल देत असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे होते. परवान्यात खताचा समावेश नसताना विक्री करण्यात आली. शिवाय गोदाम अवैध असल्याचाही आरोप शेतकऱ्यांचा होता. अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्र संचालकावर गुन्हा दाखल करा, कपाशीसह इतर पिकांच्या नुकसानीपोटी भरपाई द्या व संबंधित कृषी केंद्राची मान्यता कायमची रद्द करा, असे कृषिमंत्र्यांकडे साकडे घातले.

नुकसान भरपाई आणि कृषी केंद्र संचालकावर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. त्यामध्ये स्वप्नील राऊत, संजय निरगुळकर, धनपाल लोहारे, गणेश देशमुख, रेणुका पडोळे, सुनील खवास, दादाराव हिरेखन, परमानंद लोखंडे, नारायण डहारे, परमेश्‍वर पडोळे, केजराज पडोळे, रंजित सुखदेवे यांचा समावेश होता.

source: agrowon

Cotton Crop Fertilizer

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top