कृषी महाराष्ट्र

कापसाचे भाव तेजीतच!

कापसाचे भाव तेजीतच!

 

देशातील बाजारात आजही कापूस दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. सध्या कापसाचे दर वाढले आहेत. मात्र तरीही बाजारातील आवक अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही.

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापूस दरात (Cotton Rate) घट झाली होती. तर देशातील वाद्यांमध्येही कापसाचा बाजार (Cotton Market Rate) गाठीमागे १६० रुपयांपर्यंत घसरला. मात्र बाजार समित्यांमध्ये कापूस दरात आजही वाढ पाहायला मिळाली. तर कापसाच्या कमाल दराने काही ठिकाणी खेडा खरेदीत आज ९ हजार ९०० रुपयांचा टप्पा गाठला.

देशातील बाजारात आजही कापूस दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. सध्या कापसाचे दर वाढले आहेत. मात्र तरीही बाजारातील आवक अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही. त्यामुळे कापूस दर वाढत आहेत. देशातील बहुतांशी बाजार समित्यांमध्ये कापसाचा कमाल दर आता ९ हजारांच्या पुढे गेला.

तर आज काही ठिकाणी महाराष्ट्रात खेडा खरेदीत ९ हजार ९०० रुपयांपर्यंत कमाल दर पोचला होता. तर सरासरी दर ८ हजार ५०० ते ८ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र शेतकरी याही दरात कापूस विक्री करण्यास उच्छूक दिसत नाहीत, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर मात्र नरमले होते. कापसाच्या जानेवारी २०२३ च्या वायद्यांमध्ये अडीच टक्क्यांनी घट झाली होती. आज कापसाचे वायदे सुरुवातील ८८.३३ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होतेय. त्यात नंतर घट होत गेली. आजचा बाजार ८६.१० सेंटवर बंद झाला होता. नव्या हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात चढउतार सुरु आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दराचा मागील पाच वर्षांचा विचार करता १ मार्च २०२० रोजी सर्वात कमी ५१ सेंटवर दर घसरले होते. त्यानंतर चढउतार होत दराने १ एप्रिल २०२२ रोजी विक्रमी १४५ सेंटचा टप्पा गाठला. नंतरच्या काळात कापूस दरात पुन्हा घट होत गेली.

देशातील बाजारात नोव्हेंबरमध्ये कापूस दरात सतत सुधारणा झाली. सध्या देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाला ८ हजार ५०० ते ९ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. तर वायद्यांमध्ये कापसाचे दर गाठीमागे १६० रुपयांनी नरमले होते. आज वायद्यांमध्ये गाठींचे व्यवहार ३३ हजार २२० रुपयाने पार पडले. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. वायद्यांमध्ये कापूस नरमला मात्र बाजार समित्यांमधील दर तेजीत आहेत.

सरासरी दर काय आहे.

देशातील बाजारात अद्यापही सरासरी दर ९ हजारांपेक्षा कमी आहेत. बाजारातील कमाल दर हे चांगल्या गुणवत्तेच्या मालाला मिळत असतात. तर सरासरी दराने मध्यम गुणवत्ता असलेला कापूस विकला जातो. कापूस बाजाराचा विचार करता शेतकऱ्यांना किमान सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल. असं आवाहन जाणकारांनी केलंय.

श्रोत :- agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top