कृषी महाराष्ट्र

Crop Damage : अवकाळीची नुकसान भरपाई ई-केवायसी नसल्याने मिळेना ! वाचा सविस्तर

Crop Damage : अवकाळीची नुकसान भरपाई ई-केवायसी नसल्याने मिळेना ! वाचा सविस्तर

Crop Damage

Natural Disaster : मागील वर्षी अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला होता. त्यामुळे राज्यातील हजारो हेक्टरवरील हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले. दरम्यान, शासनाच्यावतीने सुधारित दराने तात्काळ मदत देण्याची घोषणा केली. मात्र, अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची ई-केवायसी (E-KYC) न केल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्या नाहीत.

मागील हंगामामध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर व चालू वर्षी मार्च ते एप्रिल या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या शेतपीके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. शेतपीकांचा चिखल झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते.

महसूल व कृषी विभागाकडून शेतपीकांच्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाला पाठविण्यात आला. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घेण्यात निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर १ हजार ५०० कोटींच्या निधीला मान्यताही मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे. (Crop Damage Compensation)

शेतपीकांच्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसिल कार्यालये, तलाठी कार्यालये व बाधित ग्रामपंचयात कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. परंतु अनेक बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसेच बँक खाते आधार कार्डसोबत संलग्न केल्या नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत नुकसानीची रक्कम जमा झाली नाही.

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

source:agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top