कृषी महाराष्ट्र

हवामानामुळे मोहरी उत्पादनात घट ! बाजारात MSP पेक्षा कमी भाव

हवामानामुळे मोहरी उत्पादनात घट ! बाजारात MSP पेक्षा कमी भाव

मोहरी

Mustard Production in India : मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोहरी पिकावर (Mustard crop) परिणाम झाला आहे. या बदलत्या हवामामुळे उत्पादनात मोठी घट झाली. दुसरीकडे बाजारात (APMC) मोहरीला हमीभावपेक्षा (MSP) कमी किमंत मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

या पार्श्वभूमीवर सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) ला २०२२-२३ हंगामामध्ये १११. ८३ लाख टन मोहरीचे उत्पादन अपेक्षित आहे.Mustard Production

SEA चे अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनी सांगितले की, RMSI क्रॉपनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेडने मार्चमध्ये २०२२-२३ साठी केलेल्या सर्वेनुसार मोहरी उत्पादनाचा अंदाज लावला होता. त्यांनी अवकाळी पावसाचा पिकावर परिणाम झाल्याचे सांगून मार्च महिन्यामध्ये एकूण ११५.२५ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहो. सुधारित पीक उत्पादन अंदाजे १११.८३ लाख टन इतके होण्याची शक्यता आहे. Mustard Production

MSP खाली किमती

एमएसपीपेक्षा कमी असलेल्या मोहरीच्या किमतीबद्दल चिंता व्यक्त करून ते म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) मोहरीचा भाव सध्या ₹ ५ हजार १०० प्रति क्विंटल आहे. पण, एपीएमसी यार्ड कर आणि इतर शुल्क वजा केल्यावर शेतकऱ्यांना केवळ ₹ ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० प्रति क्विंटल मिळतात. शेतकऱ्यांकडून तेलबिया खरेदी करण्याच्या सरकारच्या हालचाली असूनही मोहरीच्या APMC यार्डच्या किमती ५ हजार ४५० प्रति क्विंटलच्या MSP च्या खाली आहेत.

२०२५-२६ पर्यंत देशात मोहरीचे उत्पादन २०० लाख टनपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगून ते म्हणाले की, केंद्राने गेल्या चार वर्षांत मोहरीचे एमएसपी ₹१ हजार रुपये क्विंटलने वाढवले आहे. तसेच, पेरणीच्या वेळी पिकाला चांगली किमंत मिळाल्याने शेतकऱ्यांना मोहरीखालील क्षेत्र वाढवण्यास प्रोत्साहन मिळाले. मात्र, दुर्दैवाने, कापणीच्या वेळी, किंमत MSP पेक्षा खूपच खाली गेली आहे. एवढ्या कमी दरात विक्री करण्यास शेतकरी तयार नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. यामुळे आगामी खरीप हंगामात सोयाबीन आणि रब्बी हंगामात मोहरीचे क्षेत्र कमी होऊ शकते,” झुनझुनवाला म्हणाले.

झुनझुनवाला यांनी आशा व्यक्त केली की नाफेड आणि हाफेड सारख्या सरकारी संस्थांनी त्यांची MSP वर मोहरीची खरेदी वाढवली आहे आणि एल निनोमुळे तेलबिया पिकावर परिणाम होणार्‍या कोणत्याही संभाव्य परिस्थितीसाठी बफर स्टॉक तयार केला जाईल.

एल निनोचा प्रभाव

भारतातील हवामान विभाग (IMD) ने यावर्षी भारतात मान्सूनचा पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. अमेरिकेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने अंदाज वर्तवला आहे की मे-जुलैमध्ये अल निनोची स्थिती ६० टक्के आणि जून-ऑगस्टमध्ये ७० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. भारतातील मका, सोयाबीन आणि तांदूळ उत्पादनावर याचा परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top