कृषी महाराष्ट्र

शेतकरी मित्रांनो कापसाचं पॅनिक सेलिंग टाळा : Cotton Market

शेतकरी मित्रांनो कापसाचं पॅनिक सेलिंग टाळा : Cotton Market

शेतकरी

पुणेः देशातील बाजारात कापसाची (Cotton market) मर्यादीत आवक (Cotton Arrival) असूनही दरात चढ उतार आले. पण दरात मोठी वाढ झाली नाही. त्यामुळं बाजारात कापूस आवकेने आता जोर धरला. राज्यातील शेतकऱ्यांनीही कापूस विक्री वाढवली.

पण डिसेंबर आणि जानेवारीत कापसाची आवक जास्त असते. त्यामुळं दरही दबावात असतात. त्याचाच अनुभव सध्या येत आहे. पण पुढील काळात कापसाचे भाव (Cotton rate) वाढतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. ( Cotton Market )

कापसाचे दर मागील दोन महिन्यांपासून कमी जास्त होत आहेत. मात्र सरासरी दरपातळी कायम आहे. मागील दोन महिन्यांमध्ये कापसानं दोन वेळा ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांचा टप्पा गाठला. मात्र पुन्हा दर नरमले.

सरासरी दरपातळी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहतेय. त्यामुळं शेतकरी दरवाढीची वाट पाहत आहेत.

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात शेतातील बहुतेक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला. सगळेच शेतकरी संपूर्ण माल मागे ठेऊ शकत नाहीत.

शेतकऱ्यांना देणी, घेणी आणि इतर व्यवहारांसाठी पैशांची गरज असते. त्यामुळं शेतकरी काही कापूस विकतात. दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारीत कापसाची आवकही जास्त असते. त्यामुळं दरही दबावात येतात.

याचाच अनुभव सध्या येतोय. सध्या देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळतोय.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत देशातील बाजारात कापसाची दैनंदीन आवक १ लाख गाठींच्या दरम्यान होती.

मात्र त्यात वाढ होऊन आधी दीड लाख आणि आता दोन लाख गाठींपर्यंत आवक वाढली. म्हणजेच मागील १५ दिवसांमध्ये कापसाची आवक जवळपास दुप्पट झाली. (Cotton Market)

सरकीही नरमली

बाजारात कापसाची आवक वाढल्यानं प्रक्रियेसाठी जास्त कापूस आला. म्हणजेच सरकीची आवकही झाली. मात्र सरकी तेलाला कमी उठाव असल्याचं सांगितलं जातं. सध्या खाद्यतेल बाजार दबावात आहे.

त्यामुळं सरकीचेही दर नरमले. सरकीचे दर क्विंटलमागं २०० रुपयांनी कमी होऊन ३ हजार ४०० ते ३ हजार ८०० रुपयांपर्यंत कमी झाले.

दर जास्त कोसळणार नाहीत

सध्याचा काळ हा जास्त आवकेचा आहे. कापूस साठवण्याची सोय नसलेले शेतकरी आणि आर्थिक नड असलेले शेतकरी कापूस विकतात.

याचा अंदाज आधीपासूनच व्यापारी आणि उद्योगांना असतो. त्यामुळं मागील काही दिवसांमध्ये कमी आवक असूनही दरवाढ झाली नव्हती. पण सध्या बाजारात चर्चा सुरु आहे त्याप्रमाणं कापसाचे दर कोसळतील अशी स्थिती नाही. (Cotton Market)

काय राहील दर ?

पुढील काळात कापसाचे दर वाढू शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळावं. या काळात ज्या शेतकऱ्यांना थांबण शक्य आहे त्यांनी थांबाव. यामुळं आवक मर्यादीत राहील आणि दर जास्त नरमणार नाहीत.

शेतकऱ्यांना किमान सरासरी ८ हजार ५०० रुपयांचा दर मिळू शकतो. तर पुढील काळात कापसाची दरपाथळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top