कृषी महाराष्ट्र

शेतकऱ्यांना मिळणार घरबसल्या कीटकनाशके : खर्च आणि फसवणूक टळणार

शेतकऱ्यांना मिळणार घरबसल्या कीटकनाशके : खर्च आणि फसवणूक टळणार

 

Pesticide Regulations केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकरी त्यांच्या शेतात (Agriculture) वापरलेली कीटकनाशके घरी बसून मागवू शकणार आहेत. केंद्र सरकारने नियमात (Financial) बदल करून परवानगी दिली आहे. कृषी मंत्रालयाने (Ministry of Agriculture) कीटकनाशक नियम 1971 मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.

मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत 1971 चे नियम बदलण्यात आले असून कीटकनाशकांच्या व्यापारासाठी परवाना असलेल्या कंपन्या आता सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना (Department of Agriculture) कीटकनाशके विकू शकतील असे सांगण्यात आले आहे. यासाठी परवानाधारक कंपन्यांची वैधता ठरवण्याची जबाबदारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची असेल, एवढीच अट ठेवण्यात आली आहे.

का करण्यात येत होती मागणी?

कीटकनाशकांचा व्यवसाय (Pesticide Business) करणाऱ्या कंपन्यांकडून कीटकनाशके थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. असे केल्याने कीटकनाशक उत्पादक कंपन्या आणि कृषी (Agricultural Sector) क्षेत्राशी संबंधित व्यवसायाचा विस्तार होण्यासही मदत होईल, असे कंपन्यांचे म्हणणे होते.

शेतकऱ्यांना मिळतील सुविधा

कीटकनाशकांचा व्यवसाय (Business) करणाऱ्या कंपन्यांकडून कीटकनाशके थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. असे केल्याने कीटकनाशक उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसायाचा विस्तार होण्यासही मदत होईल, असे कंपन्यांचे म्हणणे होते. कीटकनाशके थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचवल्यास शेतकऱ्यांना सोयीसुविधांबरोबरच अस्सल कीटकनाशकेही मिळतील, असा विश्वास शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे.

खर्च आणि फसवणूक टळेल

यामुळे शेतकऱ्यांना कुठेही जावे लागणार नाही, घरपोच कीटकनाशक मिळणार आहे. भारतातील अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाइटवर कीटकनाशके उपलब्ध असतील. अशा स्थितीत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य व सुरक्षित कीटकनाशके खरेदी करण्यासाठी फारसा पैसा खर्च करावा लागणार नाही. तसेच दुकानांना विनाकारण भेटी द्याव्या लागणार नाहीत. शेतकरी फक्त ऑनलाइन ऑर्डर देऊन कीटकनाशकाची होम डिलिव्हरी मिळवू शकतील.

source : mieshetkari.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top