कृषी महाराष्ट्र

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना : जिल्हाधिकाऱ्यांचे अर्ज करण्याचे आवाहन

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना : जिल्हाधिकाऱ्यांचे अर्ज करण्याचे आवाहन

अनेकदा शेतकरी अपघातात मृत्युमुखी पडतो, किंवा शेतकऱ्याला अपंगत्व येते. यामुळे त्याला मदतीची गरज असते. यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा (Farmer Insurance) योजनेअंतर्गत त्याला मदत केली जाते. यामुळे शेतकऱ्यांनी याचा अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे.

दरम्यान, आता ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी (Farmer) अथवा त्याच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर केले नसल्यास आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या कुटूंबाला आधार मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर करावेत.

संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी तत्काळ संपर्क साधून विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत, असे सांगण्यात आले आहे.

शंभरकर म्हणाले, की ही योजना ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीकरिता खंडित झाली होती. शासन निर्णयानुसार उपरोक्त कालावधीतील प्राप्त विमा दाव्यांना तपासणी नंतर मंजुरी देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

source : krishijagran
संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी तत्काळ संपर्क साधून विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत, असे सांगण्यात आले आहे.

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top