कृषी महाराष्ट्र

पेरू पिकावरील कीड व रोग नियंत्रण

पेरू पिकावरील कीड व रोग नियंत्रण

पेरू पिकावरील

माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

 

शेंडे अळीच्या नियंत्रणासाठी दोन मिलि क्‍लोरपारिफॉस प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

देवी रोग नियंत्रण :

ढगाळ वातावरणात देवी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. नियंत्रणासाठी बोर्डोमिश्रण (0.6 टक्के) फवारणी करावी. यासाठी 100 लिटर पाण्यात 600 ग्रॅम मोरचूद मिसळावे. त्याचा सामू सातपर्यंत करण्यासाठी 350 ग्रॅम कळीचा चुना मिसळावा. त्यानंतर आठ दिवसांनी स्ट्रेप्टोसायक्‍लीन 25 ग्रॅम आणि कॅपटाफ 250 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

मर रोग नियंत्रण :

दर चार ते सहा महिन्यांनी 25 किलो शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा 20 ग्रॅम Trichoderma 20 g in 25 kg of cow dung every four to six months आणि पॅसिलोमायसीस 20 ग्रॅम मिसळून प्रत्येक झाडास मुळाच्या परिसरात द्यावे. प्रादुर्भाव जास्त असल्यास एलिएट पाच ग्रॅम आणि क्‍लोरपारिफॉस 4 मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

मुळावर सूत्रकृमीच्या गाठीलक्षणे –

पाने बारीक होतात, तसेच पाने पिवळी पडतात.पेरू बागेतील झाडांच्या मुळांवर गाठी दिसतात.नियंत्रणाचे उपायसूत्रकृमींचा प्रादुर्भाव असलेल्या बागेमध्ये वर्षातून दोन वेळेस प्रति झाड 25 शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा 30 ग्रॅम व पॅसिलोमायसीस 30 ग्रॅम मिसळून द्यावे किंवा एक लिटर स्लरीमधून आळ्यात मिसळावे.फळधारणा कमी होत असल्यास, प्रत्येक झाडास 40 ग्रॅम फोरेट (10 टक्के दाणेदार) कीटकनाशक झाडाखाली जमिनीत आळ्यामध्ये एकसारखे मिसळावे.अशा बागेत चांगल्या निंबोळी पेंडीचा वापर दोन किलोग्रॅम प्रतिझाड याप्रमाणात करावा.

मिलीबगचा प्रादुर्भाव –

पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर, तापमानात वाढ होतेवेळी मिलीबगचा प्रादुर्भाव फांद्या, फुले व फळांचे देठ यावर होण्यास सुरवात होते.

नियंत्रणाचे उपायप्रत्येक झाडाच्या आळ्यामध्ये 20 ग्रॅम व्हर्टीसिलियम लेकॅनी हे बुरशीनाशक 25 शेणखताबरोबर मिसळून जमिनीत मिसळावे.फांद्या व फळांवर मिलीबग दिसताच 5 ग्रॅम व्हर्टीसिलियम लेकॅनी व दूध 10 मि.लि. प्रति लिटर पाण्यातून झाडावर फवारावे.प्रादुर्भाव जास्त असल्यास अबामेक्‍टीन (1.9 इसी) 0.5 मि.लि. प्रति लिटर किंवा ब्यूप्रोफेझीन 1.25 मि.लि.प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पेरूवरील फळमाशीचे नियंत्रण

साधारण फळे मोठी होत असताना फळमाशीचा प्रादुर्भाव वाढतो.नियंत्रणाचे उपाय एकरी पाच फळमाशीचे रक्षक कामगंध सापळे लावावेत. चांगल्या नियंत्रणासाठी सामूहिक पद्धतीने उपाययोजना करणे फायदेशीर ठरते.प्रादुर्भाव जास्त असल्यास डायक्‍लोरव्हॉस 2 मिलि प्रति लिटर किंवा क्‍लोरपायरीफॉस 2 मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पेरू पिकावरील

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top