कृषी महाराष्ट्र

लिंबूवर्गीय फळ पिकांमध्ये उंच वाफे लागवड प्रणाली व सर्व माहिती

लिंबूवर्गीय फळ पिकांमध्ये उंच वाफे लागवड प्रणाली व सर्व माहिती

लिंबूवर्गीय फळ

भारतातील एकूण फळपिक क्षेत्रापैकी सुमारे ४.८३ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये लिंबूवर्गीय पिकाची लागवड केली जात असून एकूण उत्पादन सुमारे ४२.८ लाख टन एवढे आहे. भारतातील एकूण नागपुरी संत्राचे १४७२४०१ टन उत्पादन असून १६५३७६ हेक्टर क्षेत्र आणि १०.० टन/हेक्टर उत्पादकता आहे, जे ब्राझील, चीन, मेक्सिको आणि स्पेन सारख्या इतर विकसित देशांच्या तुलनेत खूपच कमी (३०-४० टन/ हेक्टर) आहे.

सर्व लिंबूवर्गीय उत्पादक राज्यांपैकी, महाराष्ट्र राज्यात लिंबूवर्गीय पिक क्षेत्र (१.६० लाख हेक्टर) व उत्पादन (६.२ लाख टन) या बाबतींत एक आघाडीचे राज्य आहे. भारतात लिंबूवर्गीय फळे म्हणजे संत्रा, मोसंबी आणि लिंबू त्यांच्या अंतर्गत एकूण क्षेत्रफळाच्या (३.४८ लाख हेक्टर) अनुक्रमे ५०, २० आणि १५ टक्के आहे.

भारतातील लिंबूवर्गीय फळांच्या लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी सुमारे ४२% क्षेत्र संत्रा पिकाने व्यापलेले आहे. मोसंबी (सायट्रस सायनेन्सिस) हे राज्यातील सर्वात प्रचलित लिंबूवर्गीय फळ असून ते महाराष्ट्राच्या विदर्भ भागात आणि मध्य प्रदेशच्या लगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जातात.

उंच वाफा:

उंच वाफा हि एक आधुनिक लागवड पद्धत आहे ज्यामध्ये जमिनीच्या क्षेत्रफळानुसार १-२ मीटर रुंदीचे उंच वाफे तयार केले जातात. हि पद्धत कमी पाण्याच्या भागात फळझाडांच्या लागवडीसाठी वापरली जाते. मुसळधार पाउस असलेल्या भागातही या पद्धतीत झाडे उंच वाफ्यावर न कोसळता वाढू शकतात तसेच पाण्यासोबत खते वाहून जाणे, मूळकुज होणे इत्यादी नुकसान टाळले जातात. उंच वाफा पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे सरींमध्ये पाणी साचले जाते व त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढते.

उंच वाफा लागवड पद्धतीची आवश्यकता का आहे ?

उंच वाफ्यावर फळझाडे वाढवण्याचे अनेक फायदे आहेत जसे की वसंत ऋतूमध्ये माती लवकर तापते, त्यामुळे लवकर लागवड करता येते, पाण्याचा सहज निचरा होऊ शकतो. लिंबूवर्गीय फळ झाडांची मुळे जमिनीत जास्त खोलवर जात नाहीत.

त्यामुळे उंच वाफ्यातील पाणी, खते व पोषक द्रव्य यांचा झाडांच्या वाढीसाठी पुरेपूर उपयोग होतो. झाडांच्या वाढीसाठी मोकळी माती आवश्यक असते कारण मोकळ्या मातीमध्ये झाडाच्या मुळांना वाढण्यासाठी भरपूर जागा मिळते.

पारंपारिक पद्धतीपेक्षा उंच वाफे पद्धत अधिक फायदेशीर ठरते. उंच वाफ्यांमुळे शिसे आणि इतर जड धातूंनी दूषित असलेल्या जमिनीवरही झाडांची सुरक्षितपणे वाढ होणे शक्य होते. या पद्धतीमुळे मातीची सुपीकता आणि गुणवत्ता सुधारते तसेच मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मात वाढ होते व क्षारतेची समस्या कमी होते. सुधारित पाणी व्यवस्थापन, उत्तम पाण्याचा निचरा व साठवण, कमी बाष्पीभवन तसेच वारा/पाणी यांची धूप (Erosion) कमी होते.

भाजीपाल्याची आंतरपीके

उंच वाफ्यावर लिंबूवर्गीय फळझाडांच्या लागवडीला चाळ क्षेत्रात भाजीपाला आंतरपीक घेण्यास वाव आहे. आयसीएआर-सीसीआरआयच्या प्रयोगाने शेतकऱ्यांना नवा मार्ग दाखवला आहे. २०२० मध्ये टोमॅटो, वांगी भेंडी, कोबी आणि मुळा या भाज्यांचे उत्पादन घेण्यात आले. टोमॅटो, वांगी, भेंडी आणि झेंडूच्या फुलांनीही मर्यादित क्षेत्रात (५०३० चौ.मी.) एवढी उत्पादकता दाखवून चांगली कामगिरी केली आहे.

वी.एन.आर. हर्ष आणि एन.एच.बी. १००१ या जातीच्या वांग्याच्या रोपांची लागवड जून २०२० मध्ये ९०×६० सें.मी. अंतरावर (रो टू रो आणि प्लांट टू प्लांट) करण्यात आली आणि कापणी जुलै महिन्यात सप्टेंबर पर्यंत सुरू झाली (२०२०) आणि जवळपास, हंगामात ३५ (टन/ हेक्टर) उत्पन्न मोजले गेले.

अभिलाष जातीच्या टोमॅटोच्या एकूण ३५० रोपांची जानेवारी महिन्यात (२०२०) ६० × ४५ सें.मी. अंतरावर (रो टू रो आणि प्लांट टू प्लांट) अंदाजे लागवड करण्यात आली. २५ टन / हेक्टर उत्पादन मोजले गेले. २०२० मध्ये प्रति हेक्टर क्षेत्राच्या आधारावर सुमारे ४.२९ टन/हेक्टर भेंडी, २० टन/हेक्टर फुलकोबी, २५ टन/हेक्टर पानकोबी आणि १२ टन/हेक्टर मुळा उत्पादनाची गणना करण्यात आली.

श्रोत : marathi.krishijagran.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top