कृषी महाराष्ट्र

जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशींसाठी बायपास प्रथिने कशी उपयुक्त ? वाचा संपूर्ण माहिती

जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशींसाठी बायपास प्रथिने कशी उपयुक्त ? वाचा संपूर्ण माहिती

जास्त दूध देणाऱ्या

दुग्धोत्पादन (Milk Production) वाढीसाठी योग्य व्यवस्थापनासोबत समतोल आहार हा खूप महत्वाचा आहे. त्या दृष्टीनेच दुभत्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे.

गायीच्या पचनसंस्थेवरच गुणवत्तापूर्ण व अधिक दुग्धोत्पादन अवलंबून आहे, हे लक्षात घेऊन तिचे चारा, पाणी व इतर आहार याबाबतचे नियोजन करावे लागतो.

गाई व म्हशींची शारीरिक वाढ, प्रजोत्पादन, गर्भाची वाढ, कासेतील ग्रंथीच्या योग्य वाढीसाठी तसेच व्याल्यानंतर दूध निर्मितीसाठी प्रथिने, ऊर्जा, खनिजे, जीवनसत्त्वे या सर्व अन्नघटकाची योग्य प्रमाणात गरज असते.

चांगल्या दुग्धोत्पादनासाठी गाई-म्हशींना सकस आणि आवश्यक अन्नघटकांनीयुक्त आहार देणे गरजेचे आहे. दुग्धोत्पादनामध्ये जादा खर्च हा पशुआहारावर होतो. मका, ज्वारी, बाजरी, डाळींच्या चुणी तसेच सरकी पेंड, सोयाबीन पेंड, भुईमूग पेंड, गव्हाचा किंवा तांदळाचा कोंडा यांचा योग्य प्रमाणात वापर करून आंबवन किंवा खुराक तयार करता येतो.

दुधामध्ये जे अन्नघटक असतात ते दुधाळ जनावरांच्या शरीरातूनच पुरविले जातात. म्हणूनच दूध निर्मितीसाठी गाई, म्हशींच्या आंचळामार्फत साधारणतः ४०० ते ४५० लीटर रक्ताचे अभिसरण होते. म्हणजेच गाई, म्हशीच्या रक्तातूनच दुधातील अन्नघटक तयार केले जातात.

जर आपण खाद्यामार्फत अन्नघटक पुरविले नाहीत तर जनावरे स्वतःच्या शरीरात साठवून ठेवलेली ऊर्जा, इतर अन्नद्रव्ये घटक यांचा वापर करतात, शेवटी याचा एकंदरीत परिणाम दुग्धोत्पादनावर व शरीरावर होतो.

हे सर्व टाळण्याकरिता दुभत्या जनावरांसाठी समतोल आहार व्यवस्थापन महत्वाचे आहे. त्यासाठी विविध प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहेत यापैकी बायपास प्रथिने कशी उपयुक्त आहेत याविषयी डॉ. दिनेश भोसले यांनी दिलेली माहिती पाहुया. Animal Care

उच्च उत्पादन देणाऱ्या दुधआळ जनावरांना चाराटंचाईच्या काळात हवी तेवढी प्रथिने मिळत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादनात घट होते.

हे टाळण्यासाठी जनावरांना खाद्यामध्ये बायपास प्रथिनांचा समावेश करावा. खाद्य घटकातील बायपास प्रथिनांच्या प्रमाणाच्या आधारावर पोषक पशुखाद्य बनवावे.

दुग्धजन्य प्राण्यांच्या पोटात चार कप्पे असतात. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘रुमेन’ जेथे बहुतेक खाद्य पदार्थ विघटित होतात.

प्राण्यांना दिले जाणारे सुमारे ६० ते ७० टक्के आहारातील प्रथिनयुक्त पदार्थ रुमेनमधील अमोनियामध्ये परावर्तित होतात.

या अमोनियाचा एक महत्त्वपूर्ण भाग युरियाच्या स्वरूपात मूत्राद्वारे उत्सर्जित केला जातो. अशा प्रकारे, महागड्या पेंड किंवा खाद्यघटकातील प्रथिनांचा मोठा भाग वाया जातो.

जर आहारातील प्रथिनयुक्त खाद्यघटकांना योग्य उपचार दिले तर रुमेनमधील प्रथिनांचा ऱ्हास कमी करता येतो. रुमेनमधील ऱ्हासापासून आहारातील प्रथिनांचे संरक्षण करण्यासाठी बायपास प्रथिने दिली जातात. Animal Care

बायपास प्रथिनांमुळे प्रथिनयुक्त खाद्यघटक लहान आतड्यात अधिक कार्यक्षमतेने पचवले जातात. परिणामी दूध उत्पादनासाठी अतिरिक्त प्रथिने उपलब्ध होतात. हे जनावरांना अधिक दूध आणि चांगल्या दर्जाचे दूध उत्पादन करण्यास मदत करते.

सरासरी १० ते १५ लिटर दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांसाठी नैसर्गिक बायपास प्रथिनांचा (सरकी पेंड, सोयाबीन मिल इ.) वापर करावा.

१५ ते २० लिटर दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांसाठी बाजारात उपलब्ध असलेले कृत्रिम पद्धतीने बनवलेली बायपास प्रथिने वापरावीत.

नैसर्गिक बायपास प्रथिने वापरत असताना पूर्ण आहारातून दिल्या जाणाऱ्या एकूण प्रथिनांमध्ये ६० ते ६५ टक्के आरडीपी व ३५ ते ४० टक्के आरयूडीपीचे प्रमाण असले पाहिजे.

बाजारातून आणलेल्या बायपास प्रथिनांमध्ये प्रमाण किमान २२ टक्के व आरयूडीपीचे प्रमाण १४ टक्के असावे.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top