कृषी महाराष्ट्र

पीक विम्यासाठी क्लेम कसा करावा ? वाचा संपूर्ण

पीक विम्यासाठी क्लेम कसा करावा ? वाचा संपूर्ण

पीक विम्यासाठी क्लेम

अनेकदा नैसर्गिक संकटे आल्यास शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. यामुळे पीएम पीक विमा योजना (PM crop insurance Scheme) सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये कमी पैसे भरून शेतकरी पिकाचा विमा उतरवतात.

नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर त्यांना क्लेम करता येतो. यामध्ये विमा कंपनी नुकसानीची भरपाई देते. यामुळे ही योजना फायदेशीर आहे.

सध्या बरेच शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढतात. ज्या शेतकरी मित्रांकडे किसान क्रेडिट कार्ड ( Kisan Credit Card) आहे तसेच ज्यांनी इतर कोणतेही कृषी कर्ज घेतले आहे ते शेतकरी त्याच बँकेतून पिकांचा विमा काढू शकतात.

यासाठी शेतकऱ्यांना बँकेत एक फॉर्म भरावा लागतो. महत्त्वाची बाब म्हणजे बँकेकडे शेतकऱ्यांची जमीन आणि इतर कागदपत्रे असल्याने विमा सहज होतो. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलेच नाही ते कोणत्याही बँकेकडून हा विमा घेऊ शकतात.

यासाठी आधारकार्ड, जमिनीशी संबंधित कागदपत्रे, शेतात पेरलेल्या पिकाचा तपशील, बँकेतील मतदार कार्ड इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत. पीक विम्यासाठी क्लेम

source : krishijagran

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top