कृषी महाराष्ट्र

Soybean Pest Control : सोयाबीनवरील केसाळ अळीचे नियंत्रण कसे करावे ? वाचा सविस्तर

Soybean Pest Control : सोयाबीनवरील केसाळ अळीचे नियंत्रण कसे करावे ? वाचा सविस्तर

 

Soybean Pest Control : तारेवरची कसरत करुन शेतकऱ्यानी कशीबशी खरीप पिकांची पेरणी केली. त्यातही ज्या ठिकाणी सोयाबीन ची वेळेवर पेरणी झालीय त्याठिकाणी सोयाबीन पीवळं पडतय. तर काही ठिकाणी विविध किडींचा उद्रेक झालाय. मागील काही दिवसात सोयाबीन वरील लोकरी अळीचा व्हीडीओ खूप व्हायरल झाला.

मात्र ही अळी खरचं लोकरी अळी आहे का? ही अळी पहिल्यांदाच सोयाबीनवर आली आहे का? आणि या अळीच्या प्रादुर्भावाची कारणे काय आहेत?आणि नियंत्रण कसं करायचं याविषय़ीची माहिती घेणार आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेली अळी लोकरी अळी म्हणून प्रसिद्ध झाली. लोकरी मावा असतो मात्र लोकरी अळी नावाची कोणतीच कीड नसते. ही कीड लोकरी अळी नसून केसाळ अळी म्हणून ओळखली जाते. ही अळी केसाळ अळी वर्गातील स्पीलोसोमा अळी म्हणून ओळखली जाते. जी प्रामुख्याने सुर्यफूल पिकावर अढळते.

यापुर्वी ही या किडीचा सोयाबीनवर प्रादुर्भाव होतं होता मात्र जास्त प्रमाणात नव्हता. त्यामुळे ही कीड काही नविन नाहीएं. गेल्या वर्षी मराठवाड्यात बऱ्याच भागात या किडीचा प्रादुर्भाव झाला होता. सोयाबीनचं वाढलेलं क्षेत्र, पावसाची अनियमितता आणि पेरणी ची बदललेली वेळ या सर्व कारणांमुळे सोयाबीनवर या किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय.

ही कीड पानाच्या खालच्या बाजूला पुंजक्याच्या स्वरुपात अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेल्या नवजात अळ्या पिवळसर रंगाच्या असतात. पूर्ण वाढलेल्या अळ्यांच्या अंगावर भरपूर प्रमाणात केस असतात. या अळ्या पानाचा हिरवा भाग खातात. त्यामुळे पाने वाळतात.

प्रादुर्भाव जर जास्त झाला तर संपूर्ण पान जाळीदार होऊन फक्त शिरा शिल्लक राहतात. या किडीचा प्रादुर्भाव ओळखून जर उपाययोजना केल्या तर प्रभावीपणे नियंत्रण होऊ शकतं त्यामुळे घाबरण्याची गरज नाहीए. Soybean Pest Control

या किडीच नियंत्रण कसं करायच ?

ज्या शेतात यापुर्वी सुर्यफूल पीक घेतल होतं त्याठिकाणी सोयाबीन पीक घेणं टाळावं. शेताच्या कडेनी सोयाबीन पेरणीच्या वेळेसच सापळा पीक म्हणून सुर्याफुलाची पेरणी करावी. शेतीचे बांध स्वच्छ ठेवावेत. अंडी अळी असलेली पाने काढून नष्ट करावीत. किडीचं रासायनिक नियंत्रण करताना. क्विनॉलफॉस २५ इसी ३० मिली १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आणि प्रादुर्भाव जर जास्त असेल तर,

क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट १.९ टक्के ईसी किंवा फ्लुबेन्डामाईड ३९.३५ टक्के एस सी ३ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के इसी ७ मिली या पैकी एका कीडनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

source :- डॉ. दिगंबर पटाईत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Soybean Pest Control

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top