कृषी महाराष्ट्र

चारा साठवणुकीचे नियोजन कसे करावे ? वाचा संपूर्ण माहिती

चारा साठवणुकीचे नियोजन कसे करावे ? वाचा संपूर्ण माहिती

चारा साठवणुकीचे नियोजन

बहुतेक ठिकाणी खरीप, रब्बी हंगामात हिरवा चारा उपलब्ध होतो. त्यामुळे जानेवारीपासून पुढे तो जूनपर्यंत जनावरांना हिरवा चारा (fodder) नसतो. हिरवी वैरण सुकवून ठेवली किंवा मुरघास तयार करून तो चारा टंचाई असताना वापरू शकतो.

हिरवा चारा योग्य वेळी व योग्य प्रकारे वाळवून सुकी वैरण तयार करता येते.

हिरवा चारा सुकवून त्यातील पोषक द्रव्ये, खनिजे व जीवनसत्वे टिकविता येतात. उत्तम प्रतीची सुकी वैरण बनविण्याचे यश हे चारा कापण्याची वेळ, त्याची वाढ, ऋतुमान व चारा वाळविण्याची इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते.
चारा फुलोऱ्यात असताना कापल्यास त्यातील पोषक द्रवे जास्तीत जास्त प्रमाणात टिकतात. गवतास बुरशी नसावी, खराब वास नसावा.
सर्वसाधारणपणे चाऱ्यामध्ये ६५.८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. परंतु सुकी वैरण बनविताना चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण १५ टक्के असावे.

द्विदल चाऱ्याची सुकी वैरण : या प्रकारच्या वैरणीमध्ये प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्वे जास्त असतात. हा चारा खाण्यास रुचकर असतो. द्विदल सुकी वैरण बनविण्यासाठी लुसर्न, बरसीम, गवार, चवळी इत्यादी पिकांचा वापर करतात.

इतर चाऱ्यापासून सुकी वैरण :

या वैरणीमध्ये द्विदल सुक्या वैरणीच्या तुलनेत प्रथिने, खनिजे व कॅरोटीनचे प्रमाण कमी असते. हा चारा कमी रुचकर असतो.
कुरणातील वाळलेले गवत, बाजरी, ज्वारी इत्यादी पिकांचा समावेश होतो. मक्यापासून प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे द्विदल चाऱ्याइतकीच मिळतात.

मुरघास निर्मिती :

हिरव्या चाऱ्यातील सर्व पोषण मूल्ये आहे त्याच प्रमाणात टिकविली जातात.
मुरघास बनविण्यासाठी योग्य चारा, योग्य कापणीची वेळ असावी. चारा लवकरात लवकर फुलोऱ्यात येणारा असावा. पिष्टमय पदार्थ अधिक असावेत.

मुरघास बनविण्यासाठी मका पिकाचा वापर करत असताना झाडाची खालची एक, दोन पाने वळायला लागतात. कणसामध्ये चीक तयार होतो तेव्हा कापणी करावी.
बरसीम, लुसर्न ही चारा पिके फुलावर आल्यावर कापणी करावी.

मुरघासासाठी खड्डा :

खड्यांची रचना, त्यांचा आकार आणि बांधणीची रचना ही त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती, जमिनीतील पाण्याची पातळी आणि जनावरांची संख्या यावर अवलंबून असते.

खड्याच्या भिंती गुळगुळीत असाव्यात. भिंतींना भेगा नसाव्यात. खड्याची खोली ही त्या भागातील जमिनीतील पाण्याच्या पातळीवर अवलंबून असते. जेथे पाण्याची पातळीवर असते तेथे जमिनीवर मनोरे बांधावेत. साधारणत: १ मीटर लांब, १ मीटर रुंद आणि १ मीटर खोल इतक्या आकाराच्या खड्यात १ टन चारा साठवता येतो.

कडबाकुट्टी यंत्राच्या साह्याने चाऱ्याचे बारीक १.५ ते २.५ सेंमी एवढे तुकडे करावेत. मुरघासाचा खड्डा साफ करून घ्यावा. तळाशी आणि बाजूंच्या भिंती यावर पसरले जाईल असे काळ्या रंगाचे प्लास्टिक पसरावे. खड्यांच्या आकारमानापेक्षा हे प्लास्टिक मोठे असावे कारण मुरघास खड्यात चारा भरताना जमिनीच्या वर १ ते १.५ मीटर पर्यंत भरावा लागतो. त्यानंतर त्यावर बाहेर सोडलेले प्लास्टिक अवरणासारखे पसरावे लागते.

कुट्टी केलेला चारा खड्यात दाबून भरून घ्यावा. त्यामुळे त्यातील हवा बाहेर निघून जाईल. चाऱ्याचा थर जमिनीच्यावर १ ते १.५ फूट आल्यावर त्यावर वाळलेले गवत, ऊस पाचट, गव्हाचे काड किंवा पॉलिथिन टाकावे. त्यावर शेण मातीचा थर द्यावा.

source : krishijagran

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top