कृषी महाराष्ट्र

Soybean Disease : सोयाबीनवरील ‘खोडकुज’चा प्रसार थांबविण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात

Soybean Disease : सोयाबीनवरील ‘खोडकुज’चा प्रसार थांबविण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात

 

Soybean Disease : पावसाचा दीर्घ खंड, जमिनीचे वाढलेले तापमान, त्यानंतर झालेला पाऊस, त्यामुळे निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळे सोयाबीनवर खोडकुज (चारकोल रॉट), मूळकुज या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाचा उद्रेक झाला. सोयाबीनच्या उशिरा परिपक्व होणाऱ्या वाणांमध्ये या रोगाचा जास्त प्रादुर्भाव आढळून येत आहे.

शेतकऱ्यांनी या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची आळवणी, तसेच शिफारशीत रासायनिक बुरशीनाशकांची योग्य प्रमाणात तज्ज्ञांचे तसेच सुरक्षितरीत्या फवारणी करून या रोगाचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र विभागातील प्रा. डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी केले. Soybean Disease

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या अभिनव संकल्पनेतून मराठवाड्यातील शेतकऱ्यांकरिता कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांच्यातर्फे विविध पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) व फलोत्पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत (हॉर्टसॅप) ऑनलाइन कृषी संवाद मालिकेचा १० भाग बुधवारी (ता. २७) आयोजित करण्यात आला होता. या वेळी डॉ. अंबाडकर बोलत होते. Soybean Disease

कुलगुरू डॉ. इंद्र मणी अध्यक्षस्थानी होते. विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे (छत्रपती संभाजीनगर विभाग), साहेबराव दिवेकर (लातुर विभाग), कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, विभागीय कृषिविद्यावेत्ता डॉ. एस. बी. पवार, डॉ. अरुण गुट्टे, क्रॉपसॅपचे समन्वय अधिकारी डॉ. अनंत लाड, क्रॉपसॅपचे संशोधन सहयोगी डॉ. राजरतन खंदारे, हॉर्टसॅपचे संशोधन सहयोगी डॉ. योगेश मात्रे, दीपक लाड सहभागी झाले होते.

प्रास्ताविक डॉ. नेहरकर यांनी केले. डॉ. अंबाडकर म्हणाले, की विदर्भ तसेच मराठवाड्यातील सोयाबीनवर खोडकुज व मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते, असे सांगण्यात आले. कपाशीवरील ‘लाल्या’ विकृती व बोंडसड या व्यवस्थापनावर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील कृषी अधिकारी, कृषी विस्‍तारक शेतकरी सहभागी झाले होते.

source: agrowon

Soybean Disease

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top