कृषी महाराष्ट्र

Jowar Market : ज्वारीच्या दरात घसरण ! वाचा सविस्तर

Jowar Market : ज्वारीच्या दरात घसरण ! वाचा सविस्तर

 

Jowar Market : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी ज्वारीचे दर प्रतिक्विंटल साडेचार ते पाच हजार रुपयांवर होते. परंतु गेल्या काही आठवड्यापासून किमान दर अडीच हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

गतवर्षी कमी पाऊस झाल्यामुळे रब्बीचे क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता होती. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसानंतर या दोन जिल्ह्यांत रब्बी ज्वारीचा पेरा वाढला आहे. शुक्रवार (ता. ५) अखेर परभणी जिल्ह्यात ८६ हजार ५०५ हेक्टरवर तर हिंगोली जिल्ह्यात १६ हजार ८९९ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. ज्वारीचा पेरा वाढल्यामुळे दरात घसरण सुरू झाली आहे, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. Jowar Market

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. ५) ज्वारीची ४७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ३५०० रुपये तर सरासरी ३३०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ४) ज्वारीची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ३८५० रुपये तर सरासरी ३६५० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. ३) ज्वारीची ३८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ३८०० रुपये तर सरासरी ३२०० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. १) ज्वारीची ३७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान २३०० ते कमाल २९०० रुपये तर सरासरी २५०० रुपये दर मिळाले. Jowar Market

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात एकदिवसाआड ज्वारीची आवक होत आहे.शनिवारी (ता. ६) ज्वारीची १५ क्विंटल आवक होती.ज्वारीला प्रतिक्विंटल किमान २४०० ते कमाल ३५७० रुपये तर सरासरी २९८५ रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. ४) ज्वारीची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान २५०० ते कमाल ५१८० रुपये तर सरासरी ३८४० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २) ज्वारीची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान २२०० ते कमाल ३४०० रुपये तर सरासरी २८०० रुपये दर मिळाले.

ज्वारी बाजारभाव खालील प्रमाणे :- 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/01/2024 Jowar Market
शहादाक्विंटल63250028712701
बार्शीक्विंटल453350055004500
बार्शी -वैरागक्विंटल30340144503700
नंदूरबारक्विंटल20271030002850
करमाळाक्विंटल65320046004100
चोपडादादरक्विंटल1420042624200
अमळनेरदादरक्विंटल40480050255025
पाचोरादादरक्विंटल5410045004300
अकोलाहायब्रीडक्विंटल2210021002100
धुळेहायब्रीडक्विंटल3240025002440
चिखलीहायब्रीडक्विंटल5200031512575
अमळनेरहायब्रीडक्विंटल20250026712671
मलकापूरहायब्रीडक्विंटल6280028752851
शेवगावहायब्रीडक्विंटल6210030002100
तळोदाहायब्रीडक्विंटल3270030002900
अमरावतीलोकलक्विंटल3240026002500
चोपडालोकलक्विंटल15257129112571
मुंबईलोकलक्विंटल1245300070005300
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल1250025002500
सोलापूरमालदांडीक्विंटल9390039003900
पुणेमालदांडीक्विंटल665560067006150
बीडमालदांडीक्विंटल37200140002909
जामखेडमालदांडीक्विंटल84420045004350
मंगळवेढामालदांडीक्विंटल42350055004000
पाचोरापांढरीक्विंटल49245128002621
दौंड-पाटसपांढरीक्विंटल4330042004200
जालनाशाळूक्विंटल140200033002795
चिखलीशाळूक्विंटल3275041503450
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल7200024502225
परतूरशाळूक्विंटल5255026502600
परभणीटालकीक्विंटल31300035003300
कल्याणवसंतक्विंटल3340042003800

Jowar Market

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top