कृषी महाराष्ट्र

Rain Forecast : राज्यात आज हलक्या पावसाचा अंदाज !

Rain Forecast : राज्यात आज हलक्या पावसाचा अंदाज !

 

Rain Forecast : मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकल्याने राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडत आहेत. आज (ता. ८) राज्यात ढगाळ आकाशासह ऊन सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज कायम असल्यानचे हवामान विभागाने म्हटले आहे.

उत्तर बांग्लादेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे सरकला आहे. Rain Forecast

हा आस पंजाबच्या अमृतसरपासून कर्नाल, बरेली, गोरखपूर, भागलपूर, मालदा ते मनिपूरपर्यंत विस्तारला आहे. पुढील चार ते पाच दिवस मॉन्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे राहण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, किनारपट्टीला समांतर कमी दाब पट्ट्याचा अभाव यामुळे मॉन्सूनमध्ये खंड पडल्याची स्थिती आहे. मॉन्सूनच्या कमजोर प्रवाहांमुळे राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप आहे.

तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस पडत आहे. आज (ता. ८) कोकणातील पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

source : agrowon

Light rain forecast in the state today

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top