कृषी महाराष्ट्र

पेरणीसाठी जवसाच्या कोणत्या सुधारित जातींची निवड कराल ?

पेरणीसाठी जवसाच्या कोणत्या सुधारित जातींची निवड कराल ?

 

जवस हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. जवसाचा उपयोग तेल व धागा निर्मितीसाठी केला जातो.

जवस (Linseed) हे रब्बी हंगामातील (Rabbi Season) महत्त्वाचे तेलबिया पीक (Oilseed Crop) आहे. जवसाचा उपयोग तेल व धागा निर्मितीसाठी केला जातो. जवस हे अतिशय पौष्टिक असून, त्यामधून आठ प्रकारची प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे व खनिजे मिळतात.

कोरडवाहू पद्धतीने पेरणी करावयाची असल्यास ऑक्टोबर च्या पहिला आठवड्यात तर बागायती क्षेत्रात ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पेरणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पण पावसामुळे रब्बी पिकाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. हा पाऊस खरीपातील काढणीला आलेल्या पिकासाठी जरी हानीकारक असला तरी रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरणारा आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनूसार जवसाची लागवड करताना परिपक्व होण्याच्या कालावधीनूसार तसेच विविध रोगासाठी प्रतिकारक्षम असलेल्या जवसाच्या पुढील वाणांची निवड करावी.

जवसाची सुधारित वाण व त्यांची वैशिष्ट्ये पेरणीसाठी जवसाच्या

१. लातूर जवस-९३ – हे लवकर तयार होणारे वाण असून कमी लागवड अंतरासाठी, कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहे. हे वाण मर, भुरी, अल्टरनेरीया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारक्षम आहे.

२. एन.एल.-९७  – हे वाण ११५ ते १२० दिवसात तयार होते. तेलाचे प्रमाण ४२ टक्के असून  मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारक्षम आहे.

३. एन. एल.- २६० हे वाण  १११ ते ११५ दिवसात तयार होते. मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारक्षम आहे.

४. शारदा – हा वाण कोरडवाहू पद्धतीने लागवड करण्यासाठी शिफारस करण्यात आले आहे. मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारक्षम आहे.

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम किंवा थायरम ३ ते ३.५ ग्रॅम लावावे.

जगभरातील अन्य बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा – news.birdocean.com

इतर माहिती :- हरभरा लागवड तंत्रज्ञान

 

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top