कृषी महाराष्ट्र

मिरची लागवड संपूर्ण माहिती

मिरची लागवड संपूर्ण माहिती

 

मिरची साठी आवश्यक हवामान कोणते, जमीन कशी लागते, कोणत्या हंगामामध्ये मिरचीची लागवड केली जाते, मिरचीचे वाण कोणकोणते, बियाण्यांचे प्रमाण दर हेक्टरी किती वापरावे, पूर्व मशागत कशी करावी, लागवड कशी करावी, त्यासाठी खत आणि पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत रोग आणि कीड व्यवस्थापन इत्यादी संपूर्ण माहिती आज या लेखामध्ये पाहणार आहोत.

माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

 

बाजारात हिरव्या मिरच्यांची वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशामधून देखील चांगली मागणी आहे. महाराष्ट्र राज्यात अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची होत असते. महाराष्ट्रातील मिरची खालील एकूण क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र हे नांदेड, जळगाव, सोलापुर, धुळे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे. मिरची मध्ये अ व क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मिरचीचा संतुलित आहारात समावेश केला जातो. स्वाद आणि तिखटपणा यामुळे मिरची महत्त्वाचे मसाला पिक मानले जाते. मिरचीचा औषधी उपयोग सुद्धा केला जातो.

हवामान

मिरची पिकाची वाढ उष्ण आणि दमट हवामानात चांगली होते आणि उत्पादनही चांगले मिळते. या पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये करता येते. पावसाळ्यात जास्त पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे मिरचीचा फुलांची गळ जास्त होते. मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले असते. मिरचीचा झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये चांगली होते. तापमानातील तफावतीमुळे फुले आणि फळे यांची गळ मोठ्या प्रमाणावर होते आणि उत्पादनामध्ये घट येते. बियांची उगवण 18 ते 27 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये चांगली येते.

जमीन

लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या आणि मध्यम भारी जमिनीमध्ये मिरचीचे पीक अतिशय चांगले येते. हलक्‍या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खते वापरली, तरी देखील मिरचीचे पीक चांगले येते. पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनी मध्ये मिरचीचे पीक अजिबात घेऊ नये. पावसाळ्यात आणि बागायती मिरचीसाठी पावसाळ्यात बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. तर उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीवर मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरची पिकाचे उत्पादन चांगले येते.

लागवड

मिरची खरीप पिकाची लागवड जून, जुलै महिन्यामध्ये करावी. तर उन्हाळी मिरची पिकाची लागवड जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये करावी.

वाण

  1. पुसा ज्वाला
  2. पंत सी एक
  3. संकेश्वरी 32
  4. जी- 2, जी- 3, जी- 4, जी- 5
  5. मुसळवाडी
  6. पुसा सदाबहार

दर हेक्टरी प्रमाण

दर हेक्टरी एक ते दीड किलो मिरचीचे बियाणे वापरावे.

पूर्वमशागत

एप्रिल, मे महिन्यामध्ये जमीन नांगरून विखरून तयार करावी. हेक्‍टरी नऊ ते दहा टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून लागवडीसाठी जमीन तयार करावी.

मल्चिंग पद्धतीने मिरची लागवड

सव्वा ते दीड फुटाच्या अंतराने करणारा हा त्याच्या नागमोडी पद्धतीने मल्चिंग छिद्रे पाडून की लागवड करणे आवश्‍यक आहे. रोपांची लागवड साडेसात ते आठ हजार रुपये एकरी या हिशोबाने तुम्हाला मिरचीचे लागत असतात. तुम्ही अगोदर बेसल डोस टाकायचा आहे. त्यानंतर मल्चिंग करायचे आहे. नंतर त्या नागमोडी अंतर आणि तुम्ही सव्वा दीड फुटावर तुम्हाला छिद्रे पाडून लागवड करायची आहे. शक्यतो नर्सरीमधील निरोगी रोपांची लागवड करावी. जेणेकरून निरोगी आणि चांगले नर्सरीतून रोपं घेतल्याने आपला वेळही वाचतो आणि आपल्याला चांगले पोषक रोप मिळते. निगराणी करताना फवारणी बाकीच्या गोष्टी त्याच्या मध्ये आपला कुठलाही वेळ जात नाही. यामुळे मित्रांनो रोपांची लागवड नर्सरीतून जर केली तर जास्तीचा फायदा आपला होत असतो.

लागवड

जिरायती मिरची पिकासाठी सपाट वाफ्यावर रोपे तयार करावीत. तर बागायती पिकासाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करावीत. गादी वाफे तयार करण्यासाठी जमीन नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी केली जाते. त्या जमिनीमध्ये दर हेक्‍टरी 20 ते 22 टन कुजलेले शेणखत मिसळावे. नंतर वीस फूट लांब आणि चार फूट रुंद उंच आकाराचे गादी वाफे तयार करून घ्यावेत. प्रत्येक गादी वाफ्यांमध्ये तीस किलो अशा प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत आणि अर्धा किलो सुफला मिसळावे.

बी पेरण्यासाठी आठ ते दहा सेंटिमीटर एवढ्या अंतरावर वाफ्याच्या रुंदीला समांतर ओळी तयार करून त्याच्यामध्ये दहा टक्के फोरेट दाणेदार 15 ग्रॅम असे दर वाफेला टाकून ते मातीने झाकून टाकावे. यानंतर या ओळी मध्ये दोन सेंटीमीटर बियांची पातळ पेरणी करावी आणि बी मातीने झाकून घ्यावेत. बियांची उगवण होईपर्यंत त्या यांना दररोज पाणी द्यावे. बी पेरल्यानंतर 30 ते 40 दिवसांनी मिरचीची रोपे लागवडीसाठी तयार होतात.

उंच आणि पसरट वाढणार्‍या मिरचीच्या जातींची लागवड 30 लांबी आणि 60 रुंदी सेंटीमीटर अंतरावर आणि बुटक्या जातींच्या मिरचीची लागवड 60 लांबी आणि 40 रुंदी सेंटीमीटर अंतरावर करावी . कोरडवाहू मिरची पिकाची लागवड करताना 45 बाय 45 सेमी अंतरावर करावी. मिरचीच्या रोपांची सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी. ही रोपे गादी वाफ्यातून काढल्यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे दहा लिटर पाण्यात 15 मिली मोनोक्रोफॉस 60 टक्‍के प्रवाही आणि 25 ग्रॅम डायथेनम 45 आणि 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक 80 टक्के मिसळलेल्या द्रावणात बुडवून लावावेत.

खत आणि पाणी व्यवस्थापन

खते दिल्यावर मिरची पिकाची वाढ जोमदार होते.
मिरचीच्या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि ओलिताच्‍या मिरची पिकासाठी दर हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश दिले द्यावे लागते.
यापैकी स्फुरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा मिरचीच्या रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावी. उर्वरित अर्धी मात्रा रोपांच्या लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पद्धतीने देण्यात यावी.
मिरची बागायती पिकाला जमिनी नुसार पाणी द्यावे.
प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी पाणी देऊ नये.
झाडे फुलावर आणि फळावर असताना झाडांना पाण्याचा ताण द्यावा आणि रोपे लावणीनंतर दहा दिवसात शेतात रोपांचा जम बसू द्यावा.
या काळामध्ये एक दिवसाआड पाणी द्यावे.
त्यानंतर पाच दिवसांच्या किंवा एक आठवड्याच्या अंतराने झाडांना पाणी द्यावे.
हिवाळ्यात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यामध्ये सहा ते आठ दिवसांच्या अंतराने मिरची पिकाला पाणी द्यावे.

आंतर मशागत

मिरचीच्या रोपांच्या लागवडी नंतर पहिली खुरपणी 20 ते 25 दिवसांनी करावी.
त्यानंतर तणांच्‍या तीव्रतेनुसार खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे.
खरीप मिरचीला लागवडीनंतर दोन ते तीन आठवड्यांनी रोपांना मातीची भर द्यावी.
मिरची पिकाच्या बाबतीत रोपांच्या लागवडीनंतर दोन महिन्यांनी हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी मातीची भर द्यावी.
आम्ही या लेखाद्वारे मिरची लागवड मिरची पिकाच्या लागवडीची आवश्यक ती माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अद्याप तुम्हाला काही अडचणी किंवा प्रश्न असतील, तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता.

mirchi lagwad mahiti in marathi, mirchi lagwad, mirchi seeds, mirchi lagwad mahiti, mirchi lagwad pdf, mirchi lagwad in marathi, mirchi lagwad kadhi karavi, mirchi lagwad yashogatha, mirchi lagwad vishe mahiti, mirchi lagwad mahiti pdf, mirchi lagwad vyavasthapan, mirchi lagwad kashi karavi, हिवाळी मिरची लागवड, तेजा 4 मिरची लागवड, ढोबळी मिरची लागवड, मिरची लागवड कधी करावी, मिरची जाती, मिरची फवारणी वेळापत्रक, मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी, मिरची भाजी, मिरचीचा ठेचा,

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top