कृषी महाराष्ट्र

Crop Insurance : नांदेडला अग्रिम विमावाटप सुरू ! वाचा सविस्तर

Crop Insurance : नांदेडला अग्रिम विमावाटप सुरू ! वाचा सविस्तर

 

Advance Crop Insurance : जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा अधीकचे नुकसान झाल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २५ टक्के अग्रिम विमा मंजुरीसाठी अधिसूचना लागू केली होती.

यानुसार जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना ही अग्रिम रक्कम त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांत ५० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती कंपनीच्या सूत्राने दिली.

नांदेड जिल्ह्यात जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी तसेच ऑगस्टमधील पावसाची अनियमितता यामुळे खरिपातील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. अशावेळी जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या २५ टक्के अग्रिम रक्कम मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनास अधिसूचना काढण्याबाबत सूचना शासनाकडून दिल्या होत्या. यानुसार जिल्ह्यामध्ये Crop Insurance

समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोयाबीन कापूस तूर व खरीप ज्वारी या पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सीझन ॲडव्हर्सिटी) अधिसूचना ता. २८ सप्टेंबर २०२३ रोजी लागू केली होती.

या अधिसूचनेद्वारे जिल्ह्यातील सर्वच ९३ महसूल मंडलांतील सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात २५ टक्के रक्कम अग्रिम विहित मुदतीत देण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले होते. Crop Insurance

परंतु या अधिसूचनेला विमा कंपनीने आक्षेप घेतला होता. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात ता. १९ ऑक्टोबरला झालेल्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कंपनीचा आक्षेप फेटाळत वास्तवादी माहिती सादर केली होती.

यामुळे अग्रिममधून काही पिकांना वगळून सोयाबीन उत्पादकांना २५ टक्के अग्रिम मंजूर करण्याचे मान्य केले. यामुळे जिल्ह्यातील साडेसहा लाख हेक्टरवर पेरणी झालेल्या सोयाबीनसाठी साडेआठ लाख विमा भरलेल्या अर्जदार शेतकऱ्यांना ३११ कोटींपेक्षा अधिकची अग्रिम रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

यांनुसार सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा होत आहे. पहिल्या दिवशी तीस कोटी, तर दुसऱ्या दिवशी वीस कोटी असे एकूण ५० कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित विमा रक्कम पुढील काही दिवसांत जमा होईल, अशी माहिती कंपनीच्या सूत्राने दिली.

Crop Insurance

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top