कृषी महाराष्ट्र

ऑनलाइन 7/12 उतारा काढण्याची सेवा बंद ! ऑनलाइन सेवा का बंद ? वाचा सविस्तर

ऑनलाइन 7/12 उतारा काढण्याची सेवा बंद ! ऑनलाइन सेवा का बंद ? वाचा सविस्तर

ऑनलाइन 7/12

काही दिवसांपासून शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारे आणि आठ-अ उतारा ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय झाला होता. यामुळे ते मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर सहजरित्या उपलब्ध होत होते.

यामुळे शेतकऱ्यांची कामे झटपट होत होती. पण आता ही सेवा बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून युनिक लँड पिन आल्यापासून सातबाराची डिजिटल स्वाक्षरी सुविधा तलाठी कार्यालात सुरू असल्याच्या सूचना संकेतस्थळावर देण्यात येत आहेत.

यामुळे अनेक अडचणी येत असून शेतकऱ्यांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी येत आहेत. काम सोपे व्हावे यासाठी शासनाने डिजिटल सातबारे मिळवण्यासाठी संकेतस्थळावर सेवा सुरू केली होती.

असे असताना आता ही ही सेवा सध्या बंद करण्यात आली आहे. ही सेवा कोणत्यातरी तांत्रिक कारणामुळे ठप्प झाली असावी, यासंदर्भात अधिक माहिती घेऊन ती पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती निवासी जिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

तलाठी कार्यालयेसुद्धा अनेकदा बंद असतात. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ देखील जात आहे. तलाठ्याकडून स्वाक्षरीचा सातबारा काढण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

7/12 उतारा म्हणजे काय | What Is Satbara Utara In Marathi

सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात.

यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स). या रजिस्टरांमध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो.

तसेच यासोबत २१ वेगवेगळ्या प्रकारचे ‘गावचे नमुने’ ठेवलेले असतात. यापैकी ‘गावचा नमुना’ नं ७ आणि ‘गावचा नमुना’ नं १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उताऱ्याला सातबारा उतारा असे म्हणतात.

गाव नमुना नंबर सात व गाव नमुना नंबर बारा हे एकत्र करून त्यातील माहिती साताबाऱ्याच्या रूपात दिली जाते.

सबब साताबार्या उतारा म्हणजे गाव नमुना सात व बारा यानाधील उतारा असतो.त्यात बरोबरीने सातबारा उतार्यात गावाचा नमुना नंबर ६ अ मधील माहितीसुद्धा समाविष्ट केलेली असते.

प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे सातबारा दर्शवतो.

Source: krishijagran.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top