कृषी महाराष्ट्र

पंजाब डख हवामान अंदाज : पावसाची राहणार उघडीप ! वाचा सविस्तर

पंजाब डख हवामान अंदाज : पावसाची राहणार उघडीप ! वाचा सविस्तर

पंजाब डख हवामान

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. गेल्या महिन्यात देखील अवकाळी पावसाने आणि गारपिटीने थैमान माजवले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

ऐन उन्हाळ्यात पडणारा हा पाऊस शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत होता. मात्र आता अवकाळी पाऊस लवकरच निरोप घेणार आहे. पंजाब डख यांनी याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. दोन तारखेनंतर पावसाची उघडीप राहणार आहे. दोन मे पासून ते चार मे पर्यंत पावसाची उघडीप राहील आणि त्यानंतर पाच मे ते सात मे दरम्यान पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

आज आणि उद्यापर्यंत पावसाची शक्यता कायम आहे. आज दोन मे 2023 रोजी तसेच उद्या तीन मे रोजी राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहणार असला तरी देखील पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात ठिकाणीच पाऊस पडणार आहे.

5-7 मे पर्यंत राज्यातील उत्तर महाराष्ट्र म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या परिसरात पावसाची शक्यता राहणार आहे. याशिवाय पूर्व विदर्भात आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी या कालावधीमध्ये पाऊस पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी वर्तवला आहे.

अजून काही दिवस राज्यात पाऊस पडणार आहे आणि त्यानंतर अवकाळी पाऊस विश्रांती घेईल यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पंजाब डख हवामान

source : krishijagran

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top