कृषी महाराष्ट्र

Rabi Jowar Sowing : हस्त नक्षत्राच्या पावसाने विश्रांती घेतल्याने रब्बी ज्वारी पेरणीला सुरुवात

Rabi Jowar Sowing : हस्त नक्षत्राच्या पावसाने विश्रांती घेतल्याने रब्बी ज्वारी पेरणीला सुरुवात

 

Rabi Jowar Sowing : लोहगाव महसूल मंडळात गणेश विसर्जनापासून हस्त नक्षत्राच्या पावसाने विश्रांती घेतल्याने वाफसा होताच अल्प शिल्लक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी रब्बी मालदाडी शाळू ज्वारीचे पेरणीला सुरुवात केली आहे.

लोहगावसह परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात रिमझिम पावसावर मोठ्या प्रमाणात कपाशी, तूर, पिकाची लागवड केली. परंतु जुलैत रिमझिम पावसावर तग धरलेले पिकांना पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. त्यामुळे पिके सुकली, वाढ खुंटली, रोगाचा प्रादुर्भाव अशा संकटात सापडली. Latest Agriculture News

सप्टेबरमध्ये निसर्गाची कृपा झाली. कमी अधिक प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. आणि गणपती गौरी आगमनातील हस्त नक्षत्रात बरा पाऊस झाला. परंतु जमिनीच्या बाहेर पाणी लोटलेच नसल्याने ओढे, नाले, पाझर तलाव, गाव तलाव, सिमेंट बंधारे कोरडे ठाक आहेत. Rabi Sowing

दरम्यान, गणपती विसर्जनापासून पावसाने उघडीप दिल्याने वाफसा होताच अल्प शिल्लक जमीन क्षेत्रात लोखंड्यापोटी रब्बी हंगामातील मालदांडी, शाळू ज्वारी पिकाची लोहगाव, मावसगव्हान, ब्रह्मगव्हाण, तोडोंळी, दिन्नापूर, लामगव्हान आदी गावांत बैल पेरणीला सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे या वर्षी जायकवाडी जलाशय प्रकल्पात पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणी जमा झाल्यामुळे व आता परतीचा पावसाची शक्यता धूसर झाल्याने धरणग्रस्त ब्रह्मगव्हाण, मावसगव्हान, लामगव्हान जोगेश्‍वरी वाडगाव, मुलानीवाडगाव, शेवता, येथील जलफुगवटा बुडित क्षेत्र रिकामे राहण्याची स्थिती आहे. धरणग्रस्त शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाने मेहनत करून ठेवलेल्या गाळपेरा जमिनीवर ट्रॅक्टर पेरणी यंत्र व बैलजोडी तिफणने पेरणी करण्यासाठी लगबग सुरू केली आहे.

Rabi Jowar Sowing

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top