Rabi Sowing : जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी धोक्यात ! वाचा सविस्तर
Rabi Sowing : जिल्ह्यात मागील महिन्याभरापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे जमिनीतील ओलावा नाहीसा झाला आहे. यामुळे खरिपातील नुकसान रब्बीत भरुन निघेल, अशी आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या हातून रब्बीही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.
जिल्ह्यात सप्टेंबर अखेर वार्षीक सरासरीच्या ८८६.८० मिलीमीटनुसार ९९.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील १०४ प्रकल्पात सध्या ५१७.१० दशलक्ष घनमीटरनुसार ७१.०२ दोन टक्के पाणीसाठा आहे.
सध्यातरी जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षीत केला नाही. परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव होण्याची शक्यता आहे. Rabi Sowing
दरम्यान यंदा पावसाचे प्रमाण बरे दिसत असलेतरी हा पाऊस कमी कालावधीत अधीक प्रमाणात पडून गेल्यामुळे याचा खरिपातील पिकांना म्हणावा तसा फायदा झाला नाही. यामुळे यंदा खरिपातील उत्पादनात मोठी घट होत आहे. ऑक्टोबर महिन्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. यामुळे रब्बीतील पेरा कमी होण्याची शक्यता आहे. Rabi Sowing
कृषी विभागाने यंदा रब्बी हंगामात पावसाच्या आशेवर पेरणीसाठी बियाणे व खते १० टक्के प्रमाणात मागणी केली आहे. मागीलवर्षी जिल्ह्यात रब्बीमध्ये तीन लाख ६६ हजार ९२५ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. यंदा चार लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त करुन तसे नियोजन केले आहे.
सध्या सोयाबीन पिकाची काढणी सुरु आहे. आगामी काळात याच जमिनीत हरभरा, गहू, करडई, रब्बी ज्वारी, सुर्यफूल आदी पिकांची पेरणी केली जाते. परंतु ऑक्टोबर सुरु होवून वीस दिवसाचा कालावधी होत आहे. या काळात पावसाने ओढ दिल्यामुळे रब्बीच्या पेरणी क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आमच्या भागात मागील पंधरा दिवसापासून पाऊस झाला नसल्याने जमिनीत कसलीच ओलं उरली नाही. यामुळे रब्बीची पेरणी पाऊस झाल्याशिवाय करता येणार नाही.
– भास्कर मेथे, शेतकरी, कापसी खूर्द, ता. लोहा, जि. नांदेड.