एका नजरेत ओळखा सात बारा खरा की खोटा ? 3 सोप्या युक्त्या
सात बारा
7/12 | शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे सातबारा उतारा (7/12) होय. कारण सातबारा उताऱ्यामुळेच सदर जमीन (Land Proof) कोणाची आहे याचा छडा लागतो. कारण बोलण्यावर कोणी विश्वास देत नाही, जगाला पुरावा लागतो. आपला मालकी (Financial) हक्क सादर करण्यासाठी आणि आपली जमीन (Department of Agriculture) कोणाच्या घशात जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांसाठी (Agriculture) सातबारा उतारा प्रचंड महत्वाची भूमिका बजावतो.
शेतकरी फसवणुकीला पडतात बळी
अनेकदा बोगस सातबारा उताऱ्याची प्रकरणे समोर येतात. जमीन खरेदी विक्री वेळी शेतकऱ्यांना (Farming) बोगस सातबारा देऊन फसवणूक केली जाते. तर अनेकदा बोगस सातबारा वापरून कर्ज (Bank Loan) घेतली जातात. ज्यामुळे आतापर्यंत अनेक जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. यामुळेच जमिनीचा सातबारा खरा आहे की, बनावट हे तपासणे महत्वाचं आहे. चला तर मग जमिनीचा सातबारा तपासण्याच्या सोप्या 3 ट्रिक जाणून घेऊयात.
सहज तपासा सातबारा बनावट की खरा?
1) तलाठ्यांची सही पडताळावी
जमिनीची खरेदी विक्री करताना सातबारा उताऱ्यावर तलाठ्यांनी सही केलेली असते. ज्यावेळी बोगस सातबारा असतो तेव्हा त्यावर तलाठ्यांनी सही नसते. यावरून तुम्ही सातबारा उतारा खरा आहे की बोगस हे समजू शकता. गेल्या दीड वर्षांपासून आता सातबाऱ्यावर डिजिटल सही केली जात आहे.
2) LGD कोड व ई-महाभूमीचा लोगो
आता नव्या बदलांनुसार सातबाऱ्यावर त्या गावचा युनिक कोड देखील देण्यात येतो. जर हा कोड तुमच्या सातबाऱ्यावर असेल तरच तुमचा सातबारा ओरिजिनल असेल. अन्यथा तो बोगस असतो. त्याचबरोबर 2 मार्च 2022 ला राज्य सरकारने सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा व ई-महाभुमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यासाठी मान्यता दिली आहे. जर तुमच्या सातबाऱ्यावर हा लोगो असेल तर तुमचा सातबारा ओरिजिनल असेल अन्यथा बोगस. अशाप्रकारे तुम्ही तुमचा सातबारा खरा आहे की खोटा हे पडताळू शकता.
3) क्यूआर कोड
आता आधुनिक जगात सगळ काही डिजिटल होत आहे. त्याचवेळी आता जमिनीचा सातबारा देखील सध्या ऑनलाईन स्वरूपात शेतकरी पाहू शकता. जर तुमच्या सातबारा उताऱ्यावर क्यूआर कोड दिला नसेल तर तुमचा सातबारा उतारा बोगस आहे असे समजा. हा कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला ओरिजिनल सातबारा दिसेल.
डिजिटल सातबारा उपलब्ध
खरं तर, शेतकऱ्यांनी अपडेटेड सातबारा उतारा वापरावा. तसेच आता डिजिटल युग आहे, त्यामुळे सातबारा आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त यायचाच वापर करावा. यामुळे शेतकरी फसवणुकीला बळी पडणार नाहीत. यासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या महाभूमी वेबसाईटवर जावे लागेल.