पेरणी यंत्र योजनाद्वारे मिळणार अनुदान : वाचा सविस्तर
पेरणी यंत्र योजनाद्वारे
बीबीएफ (BBF) यंत्राद्वारे शेतीचे काम उत्तमोत्तम होताना दिसते. या योजनेच्या ( Perni Yantra Yojana ) माध्यमातून हे यंत्र खरेदीसाठी किती अनुदान लागेल याबाबत माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. अशातच मूळ यंत्राच्या किंमतीतून ५० % दरात सूट मिळेल.
यासाठी हा अर्ज करायचा असेल तर आजच www.mahadbt.com या लिंकवर जाऊन आपण अर्ज भरू शकता. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व पिकाच्या उत्पादकतेत वाढ करण्यास मदत करणे. अधिक पाऊस झाल्यास किंवा कमी वेळेत अधिक पाऊस झाल्यास त्याचा निचरा अतिशय योग्य प्रकारे करण्यास मदत होते.
यामुळे अधिक पावसात पाणी साचून पिकांचे होणारे नुकसान टाळता येते. इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या www. MahaDBT.com संकेतस्थळावर समूह सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करून अर्ज करावा, तसेच आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.
पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत सदर घटकाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यंत्राचा वापर केल्यामुळे पेरणीसाठी कमी वेळ लागतो. योग्य प्रकारे दोन ओळीतील अंतर ठेवल्यास आंतरमशागतही करता येते. त्याचप्रमाणे या यंत्राचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा.
राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी कोणतीना कोणती योजना उपलब्ध करून देत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना शेती उपयोगी कामात होताना दिसतो. या मशिनद्वारे कमी प्रमाणात पाऊस, अधिक प्रमाणात पाऊस, पावसाचा खंड असेल तरीही बीबीएफ (BBF) यंत्राद्वारे शेतीचे काम उत्तमोत्तम होताना दिसते.
source : krishijagran