कृषी महाराष्ट्र

Lampi Virus : ‘लम्पी स्कीन’मुळे मृत जनावरांच्या पशुपालकांना अनुदान देणार ! पशुसंवर्धनमंत्री विखे पाटील

Lampi Virus : ‘लम्पी स्कीन’मुळे मृत जनावरांच्या पशुपालकांना अनुदान देणार ! पशुसंवर्धनमंत्री विखे पाटील

 

Radhakrishna Vikhe Patil : ‘लम्पी स्कीन’ या चर्मरोगामुळे मृत जनावरांच्या मालकांना याआधी जसे अनुदान दिले जात होते. त्याप्रमाणे यापुढेही अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लम्पी स्कीनच्या पार्श्‍वभूमीवर यंदा दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली. Lampy Skin

काँग्रेसच्या अमित देशमुख यांनी लम्पी स्कीन चर्मरोगाच्या पार्श्‍वभूमीवर लातूर जिल्ह्यातील ५७१ पैकी १५८ पशुपालकांना अद्याप मदत दिली नसल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. अधिवेशन संपण्यापूर्वी मृत जनावरांच्या मालकांना मदत दिली जाईल, असे आश्वासन मंत्री विखे यांनी दिले. Lampy Skin

महाराष्ट्र राज्य ‘एनडीआरएफ’च्या नियमाप्रमाणे मदत करत आहे. लम्पी स्कीनमुळे मृत जानवारांच्या मालकांना मदत करणारे हे देशातील एकमेव राज्य आहे. लसीकरणाबाबत केंद्र सरकारशी सामंजस्य करार केला आहे. लस तयार करण्यासाठी पुण्यातील लॅब सुरू होत आहे. ही लॅब सुरू झाल्यानंतर राज्याबरोबरच देशाला १०० टक्के लस राज्य सरकार पुरवठा करेल, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

भाजपच्या हरिभाऊ बागडे यांनी जनावरांच्या ठराविक संख्येमागे किती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे आणि सध्या वस्तुस्थिती काय आहे, असा प्रश्न विचारला. यावर डोंगरी भागात तीन हजार पशुधनामागे एक आणि बिगरडोंगरी भागात पाच हजार जनावरांमागे एक अशी संख्या आहे. डॉक्टरांची संख्या कमी असल्याने नव्या भरतीनंतर हा प्रश्न सोडविण्यात येईल, असेही विखे म्हणाले.

गोंधळात संपला प्रश्नोत्तराचा तास

‘लम्पी स्कीन’वरील चर्चा सुरू असताना प्रश्नोत्तराचा तास संपत आला होता. वारंवार हात वर करूनही बोलण्याची संधी न मिळाल्याने संतप्त झालेल्या भास्कर जाधव यांनी गोंधळ घालत अध्यक्षांचा निषेध केला. मात्र, त्यांचा माईक सुरू नसल्याने त्यांचे वक्तव्य रेकॉर्डवर घेण्यात आले नाही. यावर फडणवीस यांनी असा हेत्वारोप करणे बरोबर नाही, असे योग्य नाही. आपण सीनियर आाहात हे बरोबर नाही, असे सुनावले. या गोंधळात प्रश्नोतराचा तास संपला.

source : agrowon

Lampi Virus

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top