कृषी महाराष्ट्र

Pik Vima : पीक विमा अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस ! वाचा सविस्तर

Pik Vima : पीक विमा अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस ! वाचा सविस्तर

 

Pik Vima : खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्याची मुदत संपल्यानं शेकडो शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार होते. भंडारा जिह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. 40 हजारांच्यावर शेतकरी यापासून वंचित राहणार होते. पण पीक विमा अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. राज्य सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकारनं पीक विम्याची मुदत तीन दिवसांनी वाढवली आहे. 31 जुलै ही पीक विम्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, यामध्ये बदल करुन तीन ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. (Pik Vima) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचा आज (3 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे.

त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी (Farmers) अर्ज केला नाही, त्या शेतकऱ्यांनी त्वरीत अर्ज भरावा असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. शेतकरी बांधवांनी या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा (Pik Vima) भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी दिली.

आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी तीन दिवसांची मुदत वाढ देण्यात आली असल्याचे मुंडे म्हणाले. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज तीन ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरुन घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं.

हे पण वाचा : पीएम किसानचा 14वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ! यादी कश्या प्रकारे तपासावी ? वाचा संपूर्ण

कोणती कागदपत्रे गरजेची 

१) पीकपेरा स्वयं घोषणापत्र,
२) सातबारावर उतारा
३) आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँकेचे पासबूक
४) सामाईक खातेदार असल्यास द्यावयाचे संमतीपत्र

पूरग्रस्तांसाठी कंबर कसून उभे आहोत, स्वाभिमानी कडून मदतीचा हात.

अनेक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पिक विमा भरण्यासाठी वेबसाईट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. बळीराजाच्या याच मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं तशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती.

source : krishijagran

Pik Vima

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top