‘सिंधुरत्न’ अंतर्गत शेतकरी गटांना कृषी यांत्रिकीकरणाची संधी ! वाचा सविस्तर
‘सिंधुरत्न’ अंतर्गत
Shindhudurg News : जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी (Farmers Producers Company) आणि नोंदणीकृत बचत गटांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत यांत्रिकीकरणांसाठी ७५ टक्के अनुदानावर (Subsidy) योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेसाठी २ मार्चपर्यंत प्रस्ताव देण्यात यावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून (Agricultural Department) करण्यात आले आहे.
शासनाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना जाहीर केली होती. या योजनेची अमंलबजावणी आता सुरू झाली आहे.
पहिल्या टप्प्यात कृषी यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला असून १० लाखांपर्यंत अनुदान शेतकरी गट किवा शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यात येणार आहे. Mechanization Agriculture
शासनाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना जाहीर केली होती. या योजनेची अमंलबजावणी आता सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात कृषी यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला असून १० लाखांपर्यंत अनुदान शेतकरी गट किवा शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यात येणार आहे.
ट्रॅक्टर, पॉवर टिलर, भातलावणी यंत्र, स्वंयचलित पँडी ट्रान्सप्लांटर, स्वंयचलित यंत्रे, विविध क्षमतेची पॉवर बीडर, रोटाव्हेटर, विविध पीक संरक्षण उपकरणे, विविध प्रकारचे फवारणी पंप अशी शेकडो यंत्रे या योजनेतून खरेदी करता येणार आहेत. Agriculture Mechanization
या योजनेतून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ‘आत्मा’अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गट, नोंदणीकृत बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका गटाला १० लाखांपर्यंत योजनेसाठी प्रस्ताव करता येणार आहे.
यंत्रे खरेदीनंतर अनुदानाची रक्कम शासनाकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ज्यांना या योजनेसाठी प्रस्ताव करावयाचे आहेत, अशा गटांनी २ मार्चपर्यंत कृषी विभागाकडे प्रस्ताव द्यावेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षकांकडून करण्यात आले आहे.
source : agrowon.com