हवामान अंदाज : उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी वाढण्याची शक्यता
पुणे : अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. बहुतांशी ठिकाणी किमान तापमान (Minimum Temprature) १५ अंशांच्या वर गेल्याने राज्यात थंडी (Cold) कमी झाली आहे. आजपासून (ता. ३०) उत्तर महाराष्ट्राचा पारा घसरण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गुरुवारी (ता. २९) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. निफाडच्या गहू संशोधन केंद्रात १०.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १२ ते २२ अंशांच्या दरम्यान आहे. दिवसा उन्हाचा चटका कायम आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सातत्याने ३० अंशांच्या वरच आहे.
उत्तर भारतातील थंडीची तीव्र लाट ओसरली आहे. मध्य प्रदेशातील नवगाव येथे गुरुवारी (ता. २९) देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थानसह ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती राहणार आहे. उत्तरखंड राज्यात थंड दिवस अनुभवायला मिळणार आहे. राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गुरुवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३२.९ (१३.६),
जळगाव ३१.४ (१२.३),
धुळे २९.० (९.८),
कोल्हापूर ३१.६ (२०.५),
महाबळेश्वर २८.५(१६.०),
नाशिक ३२.३ (१२.४),
निफाड ३१.४ (१०.३),
सांगली ३२.४ (१८.५),
सातारा ३२.६(१६.५),
सोलापूर ३४.७ (१९.६),
सांताक्रूझ ३३.३(१८.४),
डहाणू २६.९ (१६.०),
रत्नागिरी ३४.५ (२२.०),
औरंगाबाद ३१.५ (१२.६),
नांदेड ३२.४ (१९.२),
उस्मानाबाद ३२.७ (१९.६),
परभणी ३२.७ (१७.२),
अकोला ३३.५ (१७.९),
अमरावती ३२.६ (१४.७),
बुलडाणा ३०.८ (१५.६),
ब्रह्मपुरी ३२.१ (१५.०),
चंद्रपूर ३१.६ (१७.६),
गडचिरोली ३१.२(१३.४),
गोंदिया २९.४(१०.४),
नागपूर ३०.१ (१३.८),
वर्धा ३१.०(१५.६),
यवतमाळ ३१.७ (१९.०).
स्रोत : agrowon.com