कृषी महाराष्ट्र

Weather Forecast : पुढील दोन दिवस पावसाची शक्यता ! मिचॉन्ग चक्रीवादळाचा राज्याला फटका

Weather Forecast : पुढील दोन दिवस पावसाची शक्यता ! मिचॉन्ग चक्रीवादळाचा राज्याला फटका

 

Cyclone Michong : सध्या बंगालच्या उपसागरात मिचॉन्ग चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. परिणामी येत्या 24 तासांत महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाला सुरुवात झाली आहे. चेन्नई विमानतळाच्या रनवेवर पाणी साचल्याने अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. Weather Forecast

त्यामुळे अनेक भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मागिल काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.

त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ज्वारी, कांदा, मका, द्राक्षबागा यांसह इतर हाताशी आलेली पिके पावसामुळे वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. बंगालच्या उपसागरात मिचॉन्ग चक्रीवादळ तयार झाल्याने येत्या दोन दिवसात महाराष्टातही पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे शेतीचे अजुन नुकसान होण्याची शक्यता आहे. Cyclone Michong

राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील पिके जमीनदोस्त झाली आहेत. मागील हंगामात पुरेसा पाऊल न झाल्याने दुष्काळसदृश्य परीस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मागील हंगामात जास्त पिक आलं नाही. आणि आता रब्बी हंगामात चांगल्या उत्पनाची अपेक्षा असताना या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच राज्यात आता परत पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Weather Forecast, Cyclone Michong

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top