पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज ! राज्यात येत्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता
डख यांचा हवामान
Panjabrao Dakh Weather Report | राज्यामध्ये सातत्याने वातावरणात बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानात (Temperature) मोठा बदल झालेला दिसून आला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवायला लागल्या आहे.
माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.
अशा परिस्थितीत राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढच्या महिन्यामध्ये राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार (Panjabrao Dakh Weather Report), 5 मार्चपासून नंदुरबार धुळे, जळगाव, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, माजलगाव, शिरूर या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतीतील रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांची लवकरात लवकर काढणी करून घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
त्याचबरोबर या कालावधीत पश्चिम विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागात देखील पाऊस पडण्याचा इशारा (Panjabrao Dakh Weather Report) देण्यात आला आहे. म्हणजेच एकंदरीत 5 ते 10 मार्च दरम्यान महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
या बदलत्या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस येण्याच्या आधीच शेतकऱ्यांनी शेतीतील उर्वरित कामे उरकून घ्यावीत असे आवाहन डख (Panjabrao Dakh Weather Report) यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी गहू हरभरा पिकांची लवकरात लवकर हार्वेस्टिंग करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, असे देखील डख यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
याशिवाय पश्चिम विदर्भात आणि मराठवाड्यात देखील या कालावधी दरम्यान पावसाची शक्यता आहे. म्हणजेच एकंदरीत 5 मार्च ते 10 मार्च दरम्यान महाराष्ट्रात सर्व दूर पावसाची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, नासिक व अहमदनगर या जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता आहे. सरासरी एक इंच पर्यंत पाऊस या कालावधीमध्ये कोसळू शकतो असं देखील त्यांनी नमूद केल आहे. निश्चितच पंजाबरावांचा हा अंदाज जर सत्यात उतरला तर रब्बी हंगामातील पिकांची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या काढणीसाठी आलेल्या हरभरा आणि गहू पिकाची लवकरात लवकर काढणी करण्यासाठी नियोजन करणे अत्यावश्यक राहणार आहे. यासोबतच पंजाबरावांनी शेतकऱ्यांना एक मोठा सल्ला देखील दिला आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे, शेतकरी बांधवांनी दरवर्षी होळीच्या सणाला विशेषता होळी होऊन दोन दिवसांनी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा कोसळतोच हे लक्षात ठेवायचे आहे.
यामुळे या कालावधीपूर्वी शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे उरकून घ्यावीत. या अनुषंगानेच आपल्या शेती कामाचे नियोजन शेतकऱ्यांनी आखावे. एकंदरीत पंजाब रावांनी वर्तवलेला हा अंदाज महाराष्ट्रातील संबंध शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाचा असून शेतकरी बांधवांनी आपल्या काढणीसाठी आलेल्या गहू, हरभरा पिकांची लवकरात लवकर हार्वेस्टिंग करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवणे आवश्यक राहणार आहे.
source : havamanandaj
Weather forecast of Punjabrao Dakh, The state is likely to receive rain in the coming weeks