कृषी महाराष्ट्र

किसान क्रेडिट कार्डसाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ? वाचा सविस्तर

किसान क्रेडिट कार्डसाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ? वाचा सविस्तर

किसान क्रेडिट कार्ड

Central Government Scheme Update : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. परंतु योजनेचा लाभ कसा घ्यायच्या याची खात्रीशीर माहिती बहुतांश शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या या योजनांपासून शेतकरी वंचित राहतात.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना राबवली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी क्रेडिट कार्ड देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची माहिती पाहूया.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर एक अर्ज दिला जातो. या अर्जात शेतकऱ्यांना संपूर्ण नाव, पत्ता आदी माहिती भरायची आहे. त्यानंतर किसान क्रेडिट कार्डसाठी शेतकऱ्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. पॅन कार्डची एक प्रत अर्जाला जोडून द्यावी लागते. अन्यथा शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड मिळू शकत नाही.

दुसरं कागदपत्र आहे आधार कार्ड. आधार कार्डाची एक प्रत अर्जासोबत देणे बंधनकारण आहे. त्याशिवाय अर्ज स्वीकारला जात नाही. केंद्र सरकारने बहुतांश सरकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य केलेले आहे. त्यामुळे आधार कार्डाची प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे. (Kisan Credit Card)

कार्डसाठी अर्ज केल्यानंतर एक अर्ज दिला जातो. त्या अर्जात शेतकऱ्याने माहिती भरून देणे आवश्यक आहे. परंतु त्यासोबत एक पासपोर्ट फोटो जोडून देणेही आवश्यक आहे. वरील कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट केल्यानंतर किसान क्रेडिट कार्डची प्रक्रिया सुरू होते.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top