कृषी महाराष्ट्र

Seed Treatment : कापूस, तूर व मका बियाण्यावर कोणती बीजप्रक्रिया करावी ? व ती कशी करावी ? वाचा संपूर्ण

Seed Treatment : कापूस, तूर व मका बियाण्यावर कोणती बीजप्रक्रिया करावी ? व ती कशी करावी ? वाचा संपूर्ण

Seed Treatment

Kharif Season 2023 : राज्यभरात बऱ्याच ठिकाणी पावसाचे आगमन झालेले आहे. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर खरीप पिकाच्या पेरणीला सुरुवात होईल. काही ठिकाणी पेरणीला सुरुवातही झाली आहे. कापूस, सोयाबीन, मूग -उडीद, भुईमूग, मका, तूर या प्रमुख खरीप पिकांची पेरणी करण्यापुर्वी बीजप्रक्रिया जरूर करावी.

त्यामुळे पुढील काळात या पिकावर येणाऱ्या कीड, रोगाला आळा बसेल. याशिवाय काही बीजजन्य रोगांच नीयंत्रणही होईल. या प्रमुख खरीप पिकांच्या बियाण्यावर कोणती बीजप्रक्रिया करायची याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

कापूस

कापूस बियाण्यास सुडोमोनास फ्ल्युरोसन्स १० ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा कार्बेंन्डाझिम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिज प्रक्रिया करावी. यामूळे मर व करपा यासारख्या रोगांचा प्रादूर्भाव कमी होतो. नत्र स्थिरीकरणासाठी ॲझॅटोबॅक्टर व स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू संवर्धकाची १० मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. कापूस पिकाची लागवड १५ जूलै पर्यंत करता येते. (Seed Treatment)

तूर

पेरणीपूर्वी तूर बियाण्यास कॅप्टन (८० टक्के) किंवा थायरम ७५ टक्के २० ग्रॅम किंवा कार्बेंन्डाझिम १५ ग्रॅम प्रति १० किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू प्रत्येकी १५० ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यावर बिजप्रक्रिया करावी. तुर पिकाची लागवड १५ जूलै पर्यंत करता येते.

मूग/उडीद

मूग/उडीद पेरणीपूर्वी बियाण्यास १ ग्रॅम कार्बेंन्डाझिम किंवा २ ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच ट्रायकोडर्मा १० ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. जिवाणू संवर्धक रायझोबियम व पीएसबी २५० ग्रॅम प्रत्येकी प्रति १० किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते.

भुईमूग

भुईमूग पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम (७५ टक्के) किंवा कार्बन्डाझिम (३७.५ टक्के) + थायरम (३७.५ टक्के) ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (१२ टक्के) + मॅन्कोझेब (६३ टक्के) २.५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. भुईमूग पिकाची पेरणी ७ जूलै पर्यंत करता येते.

मका

मका पिकास पेरणीपूर्वी सायॲन्ट्रानिलीप्रोल (१९.८ टक्के) + थायामिथॉक्झाम (१९.८ टक्के) एफएस ६ मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. या बिजप्रक्रियेमूळे पेरणीनंतर १५ ते २० दिवसापर्यंत पिकाचे अमेरिकन लष्करी अळीपासून संरक्षण होते. बियाण्यास थायरम २ ते २.५ ग्रॅम तसेच ॲझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top