कृषी महाराष्ट्र

उसाला पहारीनं खत का द्यावीत ? वाचा संपूर्ण माहिती व त्या माघचे कारण

उसाला पहारीनं खत का द्यावीत ? वाचा संपूर्ण माहिती व त्या माघचे कारण

उसाला पहारीनं खत

ऊस पिकासाठी (Sugarcane Crop) खताची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ, खत देण्याची योग्य पद्धत महत्वाची आहे.

आपण ज्या पद्धतीन उसाला रासायनिक खत (Chemical Fertilizer) देतो, त्यामध्ये दिलेल्या खतांपैकी नत्र २० ते ३० टक्के, स्फुरद १५ ते २५ टक्के व पालाश ५० ते ५५ टक्के पिकास उपलब्ध होतात.

हे लक्षात घेता खतांचा संतुलित वापर करावा. त्यामुळे खते वाया जाणार नाहीत आणि उसाचे अपेक्षित उत्पादन मिळवनेही शक्य होईल.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने उसाला पहारीच्या सहाय्याने खते देण्याची शिफारस केलेली आहे. उसाला पहारीने खत दिल्यामुळे काय फायदे होतात ते जाणून घेऊयात.

उसाला पहारीन खते दिल्यामुळे खत मुळांच्या सानिध्यात दिले जातात त्यामुळे ते पिकास त्वरीत उपलब्ध होतात.

दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्याने हवेद्वारे फारच कमी प्रमाणात खतांचा ऱ्हास होतो.

खत मातीआड झाल्यामुळ वाहून जात नाहीत.

खते तणांना न मिळाल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव फारच कमी दिसून येतो. व खुरपणीवरील खर्चात ५० ते ७५ टक्क्यांनी बचत होते.

तणावाटे घेतल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचे प्रमाण कमी राहते आणि जास्तीत जास्त खत मुख्य पिकाला मिळतात.

रासायनिक खत पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्ध होऊन खतांची कार्यक्षमता वाढते. व ऊसाची जोमदार वाढ होऊन भरघोस उत्पादन मिळत.

सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरण शक्य होत. त्यामुळे एकसारख पीक येत आणि उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते.

मुळांची वाढ आणि पाणी शोषण्याची क्रिया

पोषक वातवरणात ऊस लागण केल्याच्या तिसऱ्या दिवसापासून उसावरील डोळे फुगू लागतात व कांडीला मुळ्या सुटण्यास सुरुवात होते. सेटरूट्सची वाढ झपाट्याने म्हणजे २४ मि.मी. प्रति दिन या वेगाने होते, आणि या मुळांची लांबी १५० ते २५० मि.मी. झाल्यानंतर ही वाढ थांबते. ही मुळे कालांतराने काळी होतात, कुजून जातात व लागणीनंतर ८ आठवड्यांनी नाहीशी होतात.

उसाच्या उगवणीबरोबरच जमिनीमध्ये शूट रूट्स निघायला सुरुवात होते. पहिली निघालेली शूट रूट्स सेट रूट्सच्या मानाने जाड असतात. शूट रूट्स जमिनीमध्ये वेगाने वाढतात व नंतर त्यास फुटवे येऊन झपाट्याने त्यांची वाढ होते. शूट रूट्स वाढण्याचा जास्तीत जास्त वेग ७५ मि.मी. प्रति दिन इतका सुरुवातीच्या एक, दोन दिवसांत असतो व नंतर एक आठवड्याने तो ४० मि.मी. प्रति दिन इतका असतो.

जमिनीमध्ये मुळांचा विस्तार हा जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर, केलेल्या मशागतीवर व ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. उदा. ३० सेंमी खोलीमध्ये ४८ ते ६८ टक्के मुळे, ३० ते ६० सेंमी खोलीवर १६ ते १८ टक्के मुळे, ६० ते ९० सेंमी वर ३ ते १२ टक्के मुळे, ९० ते १२० सेंमी वर ४ ते ७ टक्के मुळे, १२० ते १५० सेंमी वर १ ते ७ टक्के मुळे व १५० ते १८० सेंमी खोलीवर ० ते ४ टक्के मुळे असतात.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top