कृषी महाराष्ट्र

कापूस दर वाढतील की नाही ? काय आहे कापूस मार्केटची स्थिती वाचा संपूर्ण

कापूस दर वाढतील की नाही ? काय आहे कापूस मार्केटची स्थिती वाचा संपूर्ण

कापूस दर वाढतील

Cotton Rate : मार्च महिन्यात देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात नरमाई आली. देशातील वाढलेली आवक आणि अमेरिकेतील बॅकींग क्षेत्रातील संकट यामुळं बाजारावर दबाव आहे. त्यामुळं देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी होऊनही दरात सुधारणा झाली नाही.

पण ही स्थिती जास्त दिवस टिकणार नाही. एप्रिलमध्ये कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात १ मार्च रोजी कापसाचे वायदे ८६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. त्यानंतर मात्र दरात चढ उतार होत नरमाई आली. ९ मार्चनंतर दरातील घट जास्त होती. अमेरिकेतील बॅंकींग क्षेत्रात आलेल्या संकटामुळं कापूस जास्त नरमला.

चालू हंगामात नोव्हेंबरनंतर पहिल्यांदा कापूस दराने ७७.६३ सेंटचा चप्पा गाठला. बॅकींग क्षेत्रात अस्थिरता आल्यानंतर गुंतवणूकदार शेतीमाल बाजारातील गुंतवणूक कमी करतात.

त्याचाच फटका सध्या कापसालाही बसत आहे. पण ही स्थिती जास्त काळ चालणार नाही, अशी शक्यता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. Cotton Market

देशात मार्च महिन्यात कापसाची आवक जास्त होते. मार्च महिन्यात कापसाची आवक सरासरी ६० ते ६५ हजार गाठींच्या दरम्यान असते. पण सध्या देशातील बाजारात कापसाची आवक सरासरी १ लाख २० ते १ लाख ३५ हजार गाठींच्या दरम्यान आवक होत आहे.

बाजारातील कापूस आवक जास्त होत असल्याने दरावर दबाव आला. त्यातच बॅंकींग क्षेत्रातील संकटाने आंतरराष्ट्रीय चलन बाजारात अस्थिरता आली. त्याचा परिणाम कापूस निर्यातीवर होत आहे. यामुळे सध्या कापूस दरावर दबाव आहे.

काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने मागील आठवड्यात देशातील कापूस उत्पानाचा अंदाज कमी करून ३१३ लाख गाठींवर आणला. उत्पादनाचा अंदाज कमी झाल्यानं देशातील बाजारात सुधरणा होणं अपेक्षित होतं.

पण बाजारातील वाढलेली आवक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती यामुळं दरात सुधारणा दिसली नाही. पण देशातील उत्पादन घटल्याचं स्पष्ट झालं.

त्यामुळं बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होईल. एप्रिल मध्यानंतर कापूस आवक कमी होऊन दरात सुधाणा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. Cotton Market

उत्पादन कमी

देशात महिन्याला सध्या २८ ते ३० लाख गाठी कापूस वापर होत आहे. एप्रिलपासून आवक पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. तर उतपादन घटल्यानं पुढील हंगामासाठी केवळ २७ लाख गाठी कापूस शिल्लक राहील, असा अंदाज आहे.

म्हणजेच पुढील हंगामासाठी केवळ एक महिना पुरेल एवढा कापूस शिल्लक राहील. त्यामुळं बाजारातील आवक मर्यादीत झाल्यानंतर एप्रिलमध्ये कापूस दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

किती सुधारणा होऊ शकते ?

सध्या देशातील बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळतोय. एप्रिलच्या महिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत कापूस आवकेचा दबाव राहू शकतो. या काळात जास्तीत जास्त कापूस बाजारात येईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

त्यानंतर मात्र आवक कमी होऊन दरात सुधारणा होऊ शकते. कापसाची सरासरी दरपातळी किमान ३०० ते ४०० रुपयाने सुधारु शकते. असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top