कृषी महाराष्ट्र

Cotton Market Price : कापूस भावातील सुधारणा कायम राहणार ? वायद्यांमध्ये चांगली सुधारणा ! वाचा सविस्तर

Cotton Market Price : कापूस भावातील सुधारणा कायम राहणार ? वायद्यांमध्ये चांगली सुधारणा ! वाचा सविस्तर

 

Cotton Market Price : देशातील बाजारात कापूस दरात चांगली सुधारणा झाली. देशातील अनेक बाजारांमध्ये कापसाचा भाव ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. वायद्यांमध्येही चांगली वाढ झाली. वायद्यांनी देशात ६० हजारांचा टप्पा पार केला. तर दुसरीकडे देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही दरात चढ उतार सुरु आहेत.

देशातील बाजारात ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच कापूस दरात वाढ झाली. मागील दोन आठवड्यांमध्ये कापूस क्विंटलमागं ५०० ते ७०० रुपयांनी वाढले. पण सध्या होणाऱ्या दरवाढीचा शेतकऱ्यांना तेवढा फायदा होणार नाही.

कारण बहुतांशी शेतकऱ्यांनी कापूस विकला. आता केवळ ३ ते ४ टक्केच कापूस शेतकऱ्यांकडे आहे. बहुतांशी कापूस आता व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि मिल्सकडे शिल्लक आहे. यामुळे या दरवाढीचा फायदा कमीच होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. Cotton Market Price

बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक आत दिवसाला १० ते १२ हजार गाठींच्या दरम्यान पोचली. तर दुसरीकडे सण जवळ येत असल्याने कपड्याची मागणी येत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सूत आणि पर्यायाने कापसाला मागणी वाढली.

कापसाची मागणी वाढल्याने दराला आधार मिळाला. सध्या बाजार समित्यांमध्ये कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजार समित्यांमध्ये कमाल भावाने आता ७ हजार ५०० रुपयांचा टप्पा पार केला. Cotton Market Price

वायद्यांमध्ये कापूस आता ६० हजारांच्या वरच खेळतोय. आज सायंकाळपर्यंत कापूस वायद्यांमध्ये ६० रुपयांनी वाढून खंडीमागे ६० हजार ५०० रुपयांवर पोचले होते. वायद्यांमध्ये कापूस मागील पाच दिवसांपासून ६० हजारांच्या वर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार दिसत आहेत. आज कापूस वायदे अडीच टक्क्यांनी कमी होऊन ८५.६७ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील भावपातळी एका टप्प्यावर कायम दिसते.

दुसरीकडे देशातील कापूस लागवड यंदा गेल्यावर्षीपेक्षा एक टक्क्याने कमी आहे. तर चालू महिन्यात पाऊस पडला नाही. महत्वाच्या कापूस उत्पादक महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेशात ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिला.

यामुळे पिकाची स्थिती नाजूक बनली. तसेच पुढील काळातही पाऊसमान कमीच राहण्याची शक्यता दिसते. परिणामी कापूस उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केला जात आहे. या सर्व शक्यता गृहीत धरून कापसाचे भाव पुढील काळात आणखी वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

source : agrowon

Cotton Rate, Cotton Market Price, Cotton Market Update, cotton price, Cotton Market

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top