शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचा तेरावा हप्ता जमा : यादीत तुमचे नाव कसे तपासाल ?
PM Kisan Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (ता. २७) आज पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Scheme) १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आला. एकूण आठ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बॅँक (Farmers Account) खात्यावर एकूण १६ हजार ८०० कोटी रूपये जमा करण्यात आले. (PM Kisan Scheme Instalment)
पंतप्रधान आज कर्नाटकच्या एक दिवसीय दौऱ्यावर होते. त्यावेळी बेळगावी येथे झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते प्रतिकात्मक रित्या निधी हस्तांतरण करण्यात आले.
पीएम किसान योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत प्रत्येकी दोन हजार रूपये अशी एकूण सहा हजार रूपयांची मदत करते. (PM Kisan)
या योजनेतील अकरावा आणि बारावा हप्ता गेल्या वर्षी मे आणि ऑक्टोबरमध्ये देण्यात आला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी तेराव्या हप्त्याची वाट बघत होते.
यंदा पीएम किसान सन्मान निधी योजनेतून दिली जाणारी रक्कम वाढवण्यात येईल, अशी चर्चा अर्थसंकल्पापूर्वी होती. परंतु अर्थसंकल्पात तशी काहीच घोषणा झाली नाही.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्यांनाच तेराव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांनो, तुम्हाला आपलं नाव लाभार्थ्याच्या यादीत आहे की नाही, हे तपासायचं असेल तर हे काम कराः
- https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
- वेबसाईट उघडल्यावर Farmer Corner वर क्लिक करा.
- तिथे Beneficiaries List असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- एकेक करून आपलं राज्य, जिल्हा, तालुका, गट आणि गाव सिलेक्ट करा.
- Get Report वर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रिनवर सगळ्या लाभार्थ्यांची यादी दिसेल. त्यात तुमचं नाव चेक करा.
source : agrowon.com